मोतक
मोतक (मोतक : (अ) नर, (आ) मादी.) हा भारतातील सर्वांत कमी वजनाचा मासा आहे.[ संदर्भ हवा ] याचे वजन फक्त ०·०८ ग्रॅम इतके आहे. याचे शास्त्रीय नाव होराइक्थीस सेठनाय हे आहे.या माशाचा शोध १९३८ साली लागला व याचे शास्त्रीय नाव सुंदरलाल होरा व एस्. बी. सेठना या दोन भारतीय शास्त्रज्ञांच्या गौरवार्थ दिले गेले.
शरीररचना
[संपादन]याच्या शरीररचनेत इतर माशांत न आढळणारी काही वैशिष्ट्ये आहेत. तसेच नराचे वीर्य शुक्राणुधर नावाच्या मुद्गलासारख्या आकाराच्या वीर्य-नलिकेत भरलेले असते व ते मादीच्या योनीत जननभुजेतून सोडले जाते. नंतर शुक्राणुधरातील शुक्राणू बाहेर पडतात. अशी रचना इतर माशांत आढळत नाही. गॅम्ब्युझिया, गपी, मॉली, असिपुच्छ मासा या मध्य अमेरिकेतल्या माशांत मात्र अशा प्रकारचे पण साध्या स्वरूपाचे अवयव अस्तित्वात आहेत; वर वर्णिलेला वैशिष्ट्यपूर्ण शुक्राणुधर मात्र या माशांत आढळत नाही.