मैथिल ब्राह्मण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मैथिल ब्राह्मण हे मिथिलेच्या ब्राह्मणांना दिलेले नाव आहे. मिथिला हे प्राचीन काळी भारतातील एक राज्य होते. मिथिला सध्या सांस्कृतिक प्रदेश आहे ज्यात बिहारचा तिरहुत, दरभंगा, मुंगेर, कोसी, पूर्णिया आणि भागलपूर विभाग तसेच झारखंडचा संथाल परगणा विभाग तसेच नेपाळचा राज्य क्रमांक २ आहे. जनकपूर, दरभंगा आणि मधुबनी ही मैथिल ब्राह्मणांची प्रमुख सांस्कृतिक केंद्रे आहेत. बिहार, नेपाळ, झारखंडमधील संथाल परगणा मध्ये मैथिल ब्राह्मण अधिक आहेत. मैथिल ब्राह्मण हे पंच गौड ब्राह्मणांपैकी एक आहेत. पंच गौड ब्राह्मणांतर्गत मैथिल ब्राह्मण, कन्याकुब्ज ब्राह्मण, सारस्वत ब्राह्मण, गौड ब्राह्मण, उत्कल ब्राह्मण आहेत.[१][२][३][४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Jha, Pankaj Kumar (2010). Sushasan Ke Aaine Mein Naya Bihar. Bihar (India): Prabhat Prakashan.
  2. ^ James G. Lochtefeld (2002). The Illustrated Encyclopedia of Hinduism: N-Z. Rosen. pp. 490–491. ISBN 9780823931804.
  3. ^ D. Shyam Babu and Ravindra S. Khare, ed. (2011). Caste in Life: Experiencing Inequalities. Pearson Education India. p. 168. ISBN 9788131754399.
  4. ^ https://www.cambridge.org/core/journals/modern-asian-studies/article/raja-and-rank-in-north-bihar/506B67D93D2D5F4E014A4D4A7F696797#. Missing or empty |title= (सहाय्य)