मुहूर्त विचार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

[१]

मुहूर्त विचार

तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांच्या संयोगाने शुभ व अशुभ योग होतात. त्याचप्रमाणे चंद्रबल, ताराबल षड्वर्गबल, शुभ दिन व शुभ योग यांनी अनेक कुयोगांचे व दुर्मुहूर्तांचे परिमार्जन होते. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या घटना शुभ मुहुर्तावर कराव्यात म्हणजे अरिष्ट योगामुळे होणाच्या अनेक पीडा व दोष टळतील, महत्त्वाच्या घटनांत षोडश संस्कार, वास्तु, नवीन व्यवसाय व उद्योगधंदे, महत्त्वाचे प्रवास व तीर्थयात्रा आणि सर्व महत्त्वाची कामे ही प्रामुख्याने येतात. ही कार्ये शुभ मुहुर्तावर केली असता ती सुख, समृद्धी, यश, ऐश्वर्य यास कारणीभूत होतात. त्यासाठीच शुभ मुहुर्ताजी आवश्यकता असते.


अन्नप्राशन मुहूर्त

रिक्तानन्दाष्टदर्श हरिदिवसमथो सौरिभौमार्कवारान्
लग्नं जन्मर्क्षलग्नाष्टमगृहलवगं मीनमेषालिकंच ।
हित्वा षष्ठात्समे मास्यथ ही मृगादृशां पन्चमादोजमासे
नक्षत्रैः स्यात्स्थिराख्यैः समृदुलघुचरैर्बालकान्नाशनं सत् ।।


अन्न प्राशन – जन्मापासून ६ व्या अथवा ८ व्या महिन्यात मुलाचे आणि ५ व्या अथवा ७ व्या महिन्यात मुलीचे ऊष्टावन करावे.
तिथी - २, ३, ५, ६, १२, १३, १५
वार - सोमवार. बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
नक्षत्रे - लघु – अश्विमी, हस्त, पुष्य, अभिजित, ध्रुव-रोहिणी, उत्तरात्रय. मृदु – मृग, रेवती, चित्रा, अनुराधा.
चर - स्वाती, पुनर्वसु, श्रवण, धनिष्ठा, शततारका.
लग्ने - मेष, वश्चिक व मीन लग्ने वजर्य करावीत. दिन शुद्धी पहावी. दिवसाचा पूर्वार्धच योग्य आहे. चंद्र बल असावे.


चौल मुहूर्त

चौलसंस्कारास मुहूर्त - चौलाविषयी बालकाला जन्मापासून किंवा गर्भावस्थेपासून तिसरया वर्षी अधिकार प्राप्त होत असल्यामुळे त्या तिसरया वर्षी चौलसंस्कार करावा. काही विव्दान तर असे सांगतात की, चौलसंस्कार पहिल्या, पाचव्या किंवा दुस्या वर्षी करावा. अथवा उपनयनसंस्काराच्या वेळी करावा. तात्पर्य, या प्रशस्त वर्षापैकी जे वर्ष कुलधर्माप्रमाणे योग्य असेल, त्या वर्षी चौलसंस्कार करावा. चौलसंस्कार ७ व्या वर्षी मध्यम आणि ९ व ११ व्या वर्षी अधम समजावा. चौलाकरिता सूर्याचा उदगयनकाल प्रशस्त होय. त्यातही सूर्य जेव्हा उत्तरगोली (सायनमानाने मेष, वृषभ व मिथुन या राशीत) असेल तो काल अतिप्रशस्त समजावा. माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने शुभ आहेत. त्यातही जन्मास व अधिक-क्षयमास हे त्याज्य समजावे. ज्येष्ठ अपत्याचा चौलसंस्कार ज्येष्ठ महिन्यात करु नये. शुक्लपक्ष शुभ होय. कृष्णपक्षातील शेवटचे ५ दिवस सोडून बाकीचे दिवसही शुभ मानावे. २।३।५।७।१०।११ व १३ या तिथी शुभ आहेत. चौलविषयी ब्राहम्णालारविवार, क्षत्रियाला मंगळवार, वैश्याला शनिवार व शूद्राला शनिवार असे वर्णविशेषेकरून प्रशस्त वार आहेत. गुरू, शुक्र व बुध हे तीन वार सर्वांना समान शुभ आहेत. शुक्लपक्षात सोमवारही सर्वांना शुभ मानावा. अश्र्विनी, मृग, पुनर्वसू, पुष्य, ज्येष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, घनिष्ठा, शततारका व रेवती ही नक्षत्रे प्रशस्त आहेत. अन्य मते असे आहे की, हस्त, अश्र्विनी, श्रवण, रेवती, घनिष्ठा, पुन, पुष्य, मृग व चित्रा ही ९ नक्षत्रे उत्तम, उत्तरा, उत्तराषाढा, उत्तराभाद्र, स्वाती, रोहिणी व शतता ही ६ नक्षत्रे मध्मय व बाकीची १२ नक्षत्रे निंध होत. निधन, जन्म, वैनाश, विपद, वध, प्रत्यरि या तारा वज्यृ कराव्या. अष्टमचंद्र वज्यृ करावा. लग्नकुंडलीत १०।९।१२।६।१।३।२ ही लग्ने असावी. ३।६।११ या स्थानी पापग्रह असावे. अष्टमस्थानी शुक्राखेरीज अन्य कोणतही ग्रह नसावा. केंद्रस्थानी क्षीणचंद्र, मंगळ, शनी व रवी नसावे. बुध, गुरू व शुक्र हे केंद्रस्थानी प्रशस्त होत. या चौलापासून पुढील सर्व संस्कारांना सिंहस्थ गुरू व गुरूशुक्रांचे अस्त-बाल्य-वार्घक्यकाल हे वज्यृ करावे.

गर्भे मातुः कुमारस्य न कुर्याच्चौलकर्म तु ।
पन्चमासादधः कुर्यादत ऊघ्वृं न कारयेत् ।।
पन्चाब्दात्प्रागथोघ्वृं तु गर्भिण्यामपि कारतेत् ।
सहोपनीत्या कुर्याच्चेत्तदा दोषो न विद्यते ।।
विवाहव्रतचूडासु माता यदि रजस्वला ।
तस्याः शुद्धेः परं काय माग्डल्यं मनुरब्रवीत् ।।
अलाभे सुमुहूर्तस्य रजोदोषे हुपस्थिते ।
श्रियं संपूज्य विधिवत्ततो मग्डलमाचरेत् ।।

चौलादी कर्माविषयी विशेष - ज्या पुत्राचे चौल करावयाचे त्याची माता गर्भिणी असेल तर त्या गर्भारपणाच्या काळात चौल करु नये. अन्य मुहूर्ताभावदी अडचर्णीमुळे त्या कालात करणे भागच पडेल, तर गर्भारपणाच्या पहिल्या पाच महिन्यांपर्यंतच करावे, त्यानंतर करु नये. हा कालनिषेध, पुत्राच्या वयाच्या उक्त पाच वर्षापूर्वी चौल करणे असेल, तर त्याविषयी आहे. पाच वर्षानंतर ७।९।११ या गौण वर्षी चौल करावयाचे असल्यास माता गर्भिणी असली तरी त्या गर्भारपणाच्या कालात केव्हाही विहितकाली चौल करावे किंवा उपनयनसंस्काराबरोबर चौल केले असता हा कालनिषेध मानण्याचे कारण नाही. विवाह, उपनयन व चौल ही कृत्ये त्या संस्कार्य अपत्याची माता रजस्वला असता करु नयेत, पाचव्या दिवशी मातेची शुद्धी झाल्यानंतर करावी. जर योग्य काली चांगला मुहूर्त मिळतच नसेल, तर माता रजस्वला असताही श्रीशांती करून मग ती कृत्ये करावी. पुत्राचे चौलादिसंस्कार करणारा पिता नसता त्याऐवजी मातुल, चुलता इत्यादी अन्य कोणी कर्ता असेल तर त्या कत्याची पत्नी गर्भवती किंवा रजस्वला असताही चौल संस्कार करण्याचा निषेध वरीलप्रमाणे समजावा.

चूडा वर्षातृतीयात् प्रभवति विषमेष्टार्करित्तक्घषष्ठी
पर्वोनाहे विचैत्रोदगयनसमये ज्ञेन्दुशुक्रेज्यकानाम् ।
वारे लग्नांशयोच्श्रास्व भनिधनतनौ नैधने शुद्धियुक्ते
शाक्रोपेतैर्विमैत्रैर्मृदुचरलघुभैरायषट्त्रिस्खपापैः ।।
क्षीणचन्द्रकुजसौरिभास्करैर्मृत्युशस्त्रमृतिपड्गुताज्वराः ।
स्युः क्रममेण बुधजीवभार्गवैः केन्द्रगैच्श्र शुभमिष्टतारया ।।

जन्मापासून २,४,६ वगैरे सम महिन्यात तसेच उत्तरायणात जावळ काढावे. आपापला कुलाचार पाळवा.
महिने - माघ, फाल्गुन, वैशाख व ज्येष्ठ हे महिने प्रशस्त आहेत.
नक्षत्रे - पुनर्वसु, पुष्य, अश्विनी, रेवती, मृग, श्रवण, धनिष्ठा, हस्त, चित्रा, स्वाती, शततारका.
तिथी - २,३,५,१०,१३.
वार - सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार.

  1. ^ सम्पादक डाॅ रामचन्द्र पाठक, पुस्तक मुहू्र्तचिन्तामणिः, प्रकाशन चौखम्भा संस्कृत संस्थान, वाराणसी