मुत्राह्
मुत्राह् | |
---|---|
मुत्राह् | |
Country | ओमान |
ओमानचे राज्यपाल | ओमानचे राज्यपाल |
क्षेत्रफळ | |
• एकूण | ९१ km२ (३५ sq mi) |
• Land | ९१ km२ (३५ sq mi) |
लोकसंख्या (2016) | |
• एकूण | २,३४,२२६ |
वेळ क्षेत्र | UTC+४ (+४) |
मुत्राह् (अरबी: مطرح) हा ओमानच्या मस्कत प्रांतातील एक जिल्हा आहे. अरेबियामध्ये खनिज तेलाचा शोध लागण्यापूर्वी मुत्राह् हे ओमानमधील व्यापाराचे मुख्य केंद्र होते. या प्रदेशातील सर्वात मोठे समुद्र बंदर मुत्राह येथे असल्याने आजही हे मोठे व्यापाराचे केंद्र आहे. याच्या दक्षिणेस मस्कट जिल्हा आहे. येथे इतर महत्त्वाच्या जागेंमध्ये सौक मुत्राह्, पारंपारिक बाजार आणि सोर अल-लॉवटिया, हा एक जुन्या भिंतींनी वेढलेला घरांचा एक छोटासा समूह आहे.
लोकसंख्या
[संपादन]१८३० च्या दशकाच्या सुरुवातीला एडमंड रॉबर्ट्सने येथे भेट दिली तेव्हा मुत्राह्ची लोकसंख्या अंदाजे ८,००० होती.[१] २०१६ च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या २,३४,२५५ होती तर २०१४ मध्ये २,००,५७८ इतकी होती. यानुसार मुत्राह् ओमानमधील सर्वात दाट लोकसंख्या असलेला जिल्हा आहे.[२]
अर्थव्यवस्था
[संपादन]१९व्या शतकाच्या मध्यात मुत्राह् एक जहाज दुरुस्ती उद्योगाचे केंद्र होते.[१]
सूक मुत्राह
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
अल धलाम (अरबी अर्थ अंधकार असा होतो) सौक हे सौक मुत्राह्चे स्थानिक नाव आहे. सौक मुत्राह् हे एक अरब जगातील सर्वात जुन्या बाजारपेठांपैकी एक आहे. हे मस्कट बंदराला लागूनच स्थित आहे. शिडावर चालणाऱ्या जहाजांच्या युगात या बंदराने अफाट व्यापार अनुभवला आहे कारण हे बंदर भारत आणि चीनच्या मार्गावर मोक्याच्या ठिकाणी आहे.[३] या ठिकाणी होणाऱ्या गर्दींमुळे या ठिकाणी असलेल्या दुकानात दिवसा देखील अंधार असे आणि दुकानदारांना दुकानात दिवे लावावे लागत म्हणून याच्या नावाचे साधर्म्य अंधकाराशी आहे. बाजारपेठचे नाव विशेषतः अल लावतिया मशिदीपासून खौर बिम्बा पर्यंत पसरलेल्या भागापासून ठेवले गेले आहे, येथे जवळजवळ असलेली दुकाने आणि अरुंद गल्ली बोळांमुळे येथे सूर्यप्रकाशात पोहचू शकत नसे. १९६० च्या दशकात ही जागा ओमानच्या नागरिकांसाठी पुरवठ्याचे एक मुख्य स्रोत होते. आजच्या काळापेक्षा त्यावेळेस आयुष्याच्या गरजा बऱ्याच कमी होत्या. कापड, फळ, भाज्या आणि खजूर या स्थानिक उत्पादनांच्या समवेत बहुतेक वस्तूंची आयात केली जायची.
पूर्वी बाजारपेठातील दुकानांच्या भिंती चिखल आणि ताडाच्या झाडाच्या पानांपासून बनविल्या जात असत. यामुळे या भिंती उच्च तापमान आणि कठोर हवामानामध्ये ही तग धरू शकत होत्या. आणि म्हणूनच त्या वेळी बाजारपेठातील दुकाने तयार करण्यासाठी तो सर्वात चांगला उपाय होता. आज, मस्कट नगरपालिकेने तिच लोकप्रिय शैली टिकविण्यासाठी बाजारपेठेचे नूतनीकरण केले आहे आणि सुशोभित केले आहे. तसेच आधुनिक सुविधा देखील पुरवल्या आहेत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आणि स्थानिक सामान्य खरेदीदारांना खरेदी सोयीस्कर होण्यासाठी हे नूतनीकरण अनुकुल ठरले आहे.
ईदच्या हंगामात या बाजारपेठेत अधिक गर्दी होते. या दरम्यान ओमानचे नागरिक देशभरातून कपडे आणि दागिने खरेदी करण्यासाठी येथे येतात.[४]
या बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर मुख्यतः घरगुती वस्तू, बुट आणि तयार कपड्यांची दुकाने आहेत. अजून आत गेल्यावर वेगवेगळ्या वासांचे धूप, अत्तर, तेल, आणि मसाले विकणारी दुकाने आहेत. ओमानी चांदी, पांढऱ्या डिशडशाचे आणि भरतकाम केलेले कुम्हस, चमकदार रंगाचे कापड आणि अनेक रंगांच्या डोक्यावर घालायचे स्कार्फ विकणारी छोटी दुकाने बाजूच्या रस्त्यावर आणि गल्लीमार्गावर दिसतात. खरेदीदार या बाजारपेठेत जुन्या अरबी बंदूका (मस्केट) देखील विकत घेऊ शकतात.
संदर्भ
[संपादन]- ^ a b Roberts, Edmund (1837). Embassy to the Eastern Courts of Cochin-China, Siam, and Muscat. New York: Harper & Brothers. p. 361.
- ^ "Archived copy". 2014-08-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-08-19 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)
- ^ "Ancient Treasure Ship & the Great Oman Voyage Exhibition | SGClub Portal". Sgclub.com. 2016-03-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-05-31 रोजी पाहिले.
- ^ "Archived copy". 2011-09-26 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-04-30 रोजी पाहिले.CS1 maint: archived copy as title (link)