मुंबईचे नगरपाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुंबईचे नगरपाल हे वैधानिक दर्जा नसलेले परंतु प्रतिष्ठा असलेले पद आहे. नगरपालांची नियुक्ती राज्य सरकारमधील समिती करते. मुख्यमंत्री या समितीचे प्रमुख असतात. नगरपाल हे पद बिगर राजकीय क्षेत्रात चांगले कार्य करणार्‍या व्यक्तींना देण्यात येते. या पदाचा कार्यकाळ एक वर्षाकरिता असतो. मुंबई उच्च न्यायालयाच्या इमारतीमध्ये नगरपाल यांचे कार्यालय असून न्यायालयाच्या वतीने समन्स बजाविणे, लिलाव करणे, परदेशी व्यक्तींचे स्वागत करणे आणि नामवंत व्यक्तींच्या निधनानंतर शोकसभा आयोजित करणे असे नगरपालांचे कार्य असते.

महादेव लक्ष्मण डहाणूकर हे मुंबईचे स्वातंत्र्यानंतरचे पहिले नगरपाल होय. भारतातील मुंबईकोलकाता या दोनच शहरात नगरपाल हे पद आहे.