मिशेल यो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मिशेल यो तथा मिशेल खान (६ ऑगस्ट, इ.स. १९६२:इपोह, पेराक, मलेशिया - ) ही चिनी-मलेशियन अभिनेत्री आहे. ही विशेषतः हॉंग कॉंगमधील चित्रपटांतून भूमिका करते.

२०११मध्ये ती म्यानमारमध्ये द लेडी या चित्रपटात चित्रीकरण करीत असताना तिला तेथून तडीपार करण्यात आले. त्यावेळी यो ऑंग सान सू क्यीची भूमिका करीत होती. क्राउचिंग टायगर, हिडन ड्रॅगन या चित्रपटातील भूमिकेबद्दल योला बाफ्टा पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.