मिशेल प्लाटिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिकेल प्लातिनी

मिकेल फ्रांस्वा प्लातिनी (फ्रेंच: Michel François Platini; २१ जून १९५५) हा एक माजी फ्रेंच फुटबॉल खेळाडू, प्रशिक्षक व युएफाचा विद्यमान अध्यक्ष आहे. २६ जानेवारी २००७ पासून ह्या पदावर असलेला प्लातिनी युएफाचा सहावा अध्यक्ष आहे. आजवरच्या जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक मानला जात असलेल्या प्लातिनीला युरोपामधील सर्वोत्तम फुटबॉलपटू हा पुरस्कार तीन वेळा मिळाला व तो फिफाचा सर्वोत्तम संघ ह्या काल्पनिक संघामध्ये तीनवेळा निवडला गेला. २००४ साली पेलेने जगातील १०० सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूंच्या यादीत प्लातिनीची निवड केली.

आक्रमक मिडफिल्डर ह्या स्थानावरून खेळणारा प्लातिनी १९७६ ते १९८७ दरम्यान फ्रान्स संघाचा भाग होता. त्याने १९७८, १९८२१९८६ ह्या तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये फ्रान्सकडून भाग घेतला. युएफा यूरो १९८४ स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स संघाचा देखील प्लातिनी भाग होता. प्लातिनीने फ्रान्ससाठी एकूण ७२ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये विक्रमी ४१ गोल नोंदवले. फ्रान्ससाठी सर्वाधिक गोल करण्याचा त्याचा हा विक्रम २००७ साली थियेरी ऑन्रीने मोडला. प्लतिनीने १९८८ ते १९९२ दरम्यान फ्रान्स संघाच्या प्रशिक्षकाचे कार्य सांभाळले.

क्लब पातळीवर प्लातिनी १९७२-७९ दरम्यान फ्रान्सच्या ए.एस. नॅन्सी, १९७९-८२ दरम्यान ए.एस. सेंत-एत्येन तर १९८२-८७ दरम्यान इटलीमधील युव्हेन्तुस एफ.सी. ह्या संघांसाठी खेळत होता.

बाह्य दुवे[संपादन]