या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो.
सौदा ह्या टोपणनावाने लिहिणारा उर्दू कवी मिर्झा मुहम्मद रफी 'सौदा' (जन्म : दिल्ली, इ.स. १७१३; - लखनौ, १७८१) हा एकेकाळी गाजत असलेला शायर होता. (सौदा म्हणजे उन्माद). त्याने पहिल्यांदा सुलेमान कुलीखान ‘वदाद’ला आणि नंतर तत्कालीन प्रख्यात शायर शाह ‘हातिम’ला गुरू केले होते. खुद्द दिल्लीचे बादशाह शाह आलम 'सौदा’चे शिष्य होते. मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात होणाऱ्या सततच्या चकमकीनंतर वयाच्या साठाव्या वर्षी 'सौदा'ने दिल्ली सोडली आणि तो फरुखाबादच्या नबाबाकडे गेला. तिथे तो नवाब अहमदखानचा सेवक आणि गुरू होता.
नवाब अहमदखानाच्या मृत्यूनंतर 'सौदा' अवधची राजधानी असलेल्या फैझाबादला नवाब शुजाउद्दौलाच्या नोकरीत गेला. जेव्हा अवधची राजधानी लखनौला आली तेव्हा 'सौदा'ही त्या शहरात आला. तिथे गेल्यावर काहीकाळ त्याची नवाबाशी कुरकूर झाली, पण लवकरचा मामला शांत झाला. या नवाब शुजाउद्दौलानेच 'सौदा'ला मलकुश्शुउरा हा किताब दिला आणि वर सहा हजार रुपयांचे वर्षासन बहाल केले.
लखनौमध्येच इसवी सन १७८१मध्ये “सौदा' निधन पावला.
'सौदा’ने क़सीदा (प्रशंसा काव्य), ग़ज़ल, 'मर्सिया', तज़मीन, हजो, आदि अनेक प्रकारांत काव्यरचना केल्या आहेत. 'सौदा'ने पहिल्यांदा 'मार्सिये'ला मुसद्दसच्या रूपात (सहासहा ओळींच्या कडव्यांच्या स्वरूपात) रचले.