मार्कंडेय आश्रम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

१. मध्य प्रदेशात जिथे नर्मदा नदीचा उगम होतो ते अमरकंटक नावाचे गाव आहे. असे म्हणतात की या गावी व्यास, भृगू आणि कपिलमुनी यांसारख्या ऋषींनी तपश्चर्या केली होती. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा हा भाग नदीच्या पुराने वेढला होता तेव्हा फक्त एकच ठिकाण वाचले होते, ते म्हणजे येथील मार्कंडेय आश्रम. समुद्रसपाटीपासून हे ठिकाण तीन हजार फूट उंचीवर आहे. प्रणवानंद सरस्वती हे नर्मदातटी असलेल्या या मार्कंडेय आश्रमाचे परमाध्यक्ष आहेत (इ.स. २०१४).

२. हिमाचल प्रदेशातील बिलासपूर गावाजवळ (मूळनाव व्यासपूर) सतलज नदीच्या डाव्या तीरावर एका टेकडीच्या तळाशी व्यासगुंफा नावाचे ठिकाण आहे. येथे वेदव्यासांनी तपश्चर्या केली होती असे सांगितले जाते. त्या ठिकाणापासून तीन किलोमीटरवर मार्कंडेयांचा आश्रम आहे. असे म्हणतात की या दोन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या एकाभुयारातून दोन्ही ऋषी एकमेकांना भेटण्यासाठी जा-ये करत असत.

३.


(अपूर्ण)