मांद्रेम हाऊस
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
मांद्रेम हाऊस हे गोव्यातील एक पर्यटक निवासस्थान आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]दक्षिण गोव्यातील मांद्रे या गावात समुद्रकिनाऱ्यापासून एक किलोमीटर अंतरावर हे निवासस्थान आहे. गोव्याच्या दाभोळी विमानतळापासून या ठिकाणाचे अंतर दोन तासांच्या प्रवासाइतके आहे.
वैशिष्ट्ये
[संपादन]मांद्रेम हाऊसमध्ये टाकाऊ वस्तूंचा कलात्मक पद्धतीने पुनर्वापर करून सर्व सजावट करण्यात आली आहे. त्यांत निवासी सोयीसुविधांमध्येही पुनर्वापर केलेल्या वस्तूंचा अंतर्भाव आहे.
पर्यटकांसाठी
[संपादन]'मांद्रेम हाऊस ही खाजगी मालमत्ता आहे.पर्यटकांना शुल्क आकारून निवासासाठी ही जागा दिली जाते. या ठिकाणी समाईक स्वयंपाकघराची व स्वतंत्र खोल्यांची सोय केलेली आहे. पर्यटक स्वतः स्वयंपाक करू शकतील, अशी सर्व अत्याधुनिक साधनसामग्री तसेच आवश्यक पदार्थ येथे उपलब्ध करून देण्यात येतात. छोटे उद्यान व तरण तलाव अशा अन्य सुविधा या ठिकाणी आहेत.