Jump to content

पहिला महेंद्रवर्मन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(महेंद्रवर्मन या पानावरून पुनर्निर्देशित)
सम्राट महेंद्रवर्मन पहिला
सम्राट
वराह लेणी मंदिरातील महेंद्रवर्मन प्रथम आणि त्यांच्या राण्यांची मूर्ती
अधिकारकाळ इ.स. ६००इ.स. ६३०
अधिकारारोहण सम्राट पदाभिषेक
राज्याभिषेक इ.स. ६००
राजधानी कांचीपुरम
पूर्ण नाव महेंद्रवर्मन
मृत्यू इ.स. ६३०
पूर्वाधिकारी सिंहविष्णू
उत्तराधिकारी पहिला नरसिंहवर्मन
वडील सिंहविष्णू
पत्नी महाराणी देवसोमा
संतती पहिला नरसिंहवर्मन
राजघराणे पल्लव वंश
धर्म हिंदू धर्म
जैन धर्म

पहिला महेंद्रवर्मन (६०० - ६३०) हा पल्लव राजा होता. याची राजधानी कांचीपुरम येथे होती.हा ७ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतातील सध्याच्या आंध्र प्रदेशाच्या दक्षिणेकडील भाग आणि सध्याच्या तमिळनाडूच्या उत्तरेकडील प्रदेशावर राज्य करणारा एक पल्लव सम्राट होता. तो एक विद्वान, चित्रकार, वास्तुकार आणि संगीतकार होता. तो सिंहविष्णूचा मुलगा होता,ज्याने कालभ्रांचा पराभव करून पल्लव राज्याची पुनर्स्थापना केली .

याने मत्तविलास प्रहसन नावाचे संस्कृत मार्मिक नाटक लिहिले.