Jump to content

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग ही महाराष्ट्र सरकारची एक स्वतंत्र अभिकरण आहे, जे २६ एप्रिल १९९४ रोजी स्थापन झाली.

  • महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग हा महाराष्ट्र राज्यात ग्रामीण आणि शहरी स्थानिक संस्था निवडणुका घेते.
    • हा निवडणूक आयोग राज्य विधानसभा, विधानपरिषद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती अशा निवडणुका घेत नाही.

फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आयोजित करतो.‌ भारतीय संविधानात भाग 9 अ अंतर्गत 243(K) आणि 243Z(A)मध्ये याची तरतूद आहे.

  • महाराष्ट्राचे निवडणूक आयुक्त-
  1. दे.ना. चौधरी (१९९४ - १९९९)
  2. य.ल. राजवाडे (१९९९ - २००४)
  3. श्री. नंदलाल (२००४ - २००९)
  4. श्रीमती नीला सत्यनारायण (२००९ - २०१४)
  5. श्री. जोगेश्वर सहारिया (२०१४ - २०१९)
  6. यु.पी.एस. मदन (२०१९ - २०२४)
  7. एस.चोक्कालिंघम (प्रभारी)
  8. दिनेश वाघमारे (२० जानेवारी, २०२५ ते आत्तापर्यंत)


  • पात्रता:-
  1. भारताचाच नागरिक असावा.
  2. भारतीय प्रशासनाचा दीर्घ अनुभव असावा.
  3. राज्यपालांच्या मते ती व्यक्ती योग्य असावी.

दर्जा = राज्याच्या मुख्य सचिव /प्रधान सचिव प्रमाणे.

  • राजीनामा: राज्यपालांकडे
  • पदमुक्त: राष्ट्रपतीद्वारे.

संदर्भ

[संपादन]