Jump to content

महाराष्ट्र मंडळ (देवास)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मध्य प्रदेशातल्या जवळ जवळ प्रत्येक छोट्या मोठ्या शहरात मराठी माणसे मोठ्या प्रमाणावर राहात आहेत. इंदूर,उज्जैनच्या जवळ असलेले आणखी एक शहर म्हणजे देवास. देवासला कलेची भूमी म्हणले जाते. देवासला सांस्कृतिक, धार्मिक वातावरण आहे. येथे १९४६ साली महाराष्ट्र समाजाची स्थापना झाली. डॉ. रामचंद्र ओक, सीताराम पुराणिक, बबन भागवत, भालचंद्र सुपेकर, वासुदेव आपटे अशा काही लोकांनी त्याकाळी मराठी लोकांनी एकत्र यावे असे मनाशी घेतले आणि मंडळ स्थापन केले. मध्य प्रदेशचे त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष असलेले अनंत पटवर्धन यांची मोलाची मदत मिळाली, आणि त्या काळात समाजाने खूप उन्नती साधली. येथे गणेशोत्सव तर होताच., पण अन्य मराठी सणवारही साजरे होऊ लागले. प्रसिद्ध गायक कुमार गंधर्व देवासला स्थायिक झाले होते.

देवासमधील महाराष्ट्र समाजाची नाट्य शाखा ही खूप ॲक्टिव आहे. समाजातील सदस्य नाटक बसवतात व सादर करतात. अनेक चांगले कलाकार इथून घडून गेलेही आहेत. अनेक सदस्य मराठीतून चांगले लिखाण करत आहेत. त्यापैकी रमेश भावसार यांचे ‘भावतरंग’ हे पुस्तक तर चेतन फडणीस यांचे ‘चैतन्यझारा’ हे पुस्तक प्रकाशितही झालं आहे.

देवासच्या महाराष्ट्र मंडळाचा पत्ता असा आहे. :

मराठी सांस्कृतिक मंडळ
३० एम. आय. जी., जवाहरनगर, देवास,
मध्य प्रदेश ४५५००१