मलबार आलमंड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Broom icon.svg
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही.
कृपया लेख तपासून पुनर्लेखन करावे. हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली आढळल्यास वापरला जातो. कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहावी.मलबार आलमंड

Terminalia catappa fruits
Teca 001

मलबार आलमंड या झाडाला देशी बदाम असेही म्हणतात.या वनस्पतीचे कूल कॉम्ब्रीटेसी आहे. देशी बदामाच्या झाडाची गळती होताना पानं लाल होतात, पिवळी होतात. असा अखेरचा शृंगार करून मग छानपैकी निरोप घेतात. रस्तोरस्ती, अनेक वसाहतींमध्ये, शिस्तीने चक्राकार फांद्यांच्या रचनेने शोभणारी देशी बदामाची झाडे चाळीस ते पन्नास फुट उंची सहज गाठतात. नवी, तरूण झाडे तर अगदीच शिस्तबद्ध असतात. फांद्या खालच्या बाजूला लांबसडक तर वरवरच्या जरा जरा आखूड होणाऱ्या असल्यामुळे झाडाला पॅगोडाचा आकार येतो. पण एकदा झाडं जुनी झाली की ही शिस्त जग गुंडाळून ठेवून डेरेदार होऊ लागतात. बदामाची फुलं नाजूक असतात. फुलांना उग्रर वास येतो.मंजिऱ्यावर फुलणाऱ्या या पांढरट हिरव्या नाजूक फुलांतून जवळ जवळ अंड्याएवढं मोठं फळ मिळतं. या फळांचे हिरवे गूच्छही खूपच छान दिसतात. पिकल्यावर किरमिजी लाल होणारी ही फळं चवीला तुरट गोड लागतात.या फळांमध्ये प्रथिनांचे प्रमाण फार असते. आतली बी म्हणजे खरचं देशी बदाम हे नाव सार्थ करणारी चवदार चीज असते.हा बदाम सुकामेवा बदाम यांपेक्षा वेगळा असतो . पानगळीला रंगतदार करणारं हे झाड फार काळ निष्पर्ण रहात नाही. दहा पंधरा दिवसाच्या आतच हिरव्या पर्णकळ्यांनी उमलून येत हा नखरेदार वृक्ष हिरवाकंच नटून बसतो.

हा वृक्ष मलाया किनारपट्टीवर आढळतो.

संदर्भ[संपादन]

वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक