Jump to content

मरियाना खंदक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मारियाना खंदक (इंग्लिश: Mariana Trench) (अन्य उच्चार - मरियाना, मेरियाना) हा प्रशांत महासागराच्या तळावरील एक भूभाग आहे. समुद्रसपाटीपासून १०,९११ मीटर (३५,७९७ फूट) जवळपास ११ कि.मी इतक्या खोलीवरील मारियाना खंदक ही पृथ्वीवरील सर्वात खोल जागा मानली जाते. हा खंदक २,५५० किमी लांब तर सरासरी ५९ किमी रुंद असून तिचे भौगोलिक स्थान जपानच्या दक्षिणेला व फिलिपिन्सच्या पूर्वेला येतो. ’चॅलेंजर डीप’ हा मारियाना खंदकामधील सर्वात खोल बिंदू आहे.

याची तुलना जगातील सर्वात उंच ठिकाणाशी करायची म्हणले तर माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर ८,८४८ मीटर (२९,०२९ फूट) इतक्या उंचीवर आहे. त्याच्या उंचीपेक्षा या खंदकाची खोली अधिक आहे. मारियाना खंदकाच्या तळावर १,०८६ बार इतका पाण्याचा दाब पडतो व तो पृ्थ्वीवरील एखाद्या सपाट भूमीवर पडणाऱ्या वातावरणातील हवेच्या दाबाच्या १,००० पट अधिक आहे.

या खंदकाचा तळ गाठण्याचे आजवर तीन यशस्वी प्रयत्‍न झाले आहेत.

बाह्य दुवे

[संपादन]


गुणक: 11°21′N 142°12′E / 11.350°N 142.200°E / 11.350; 142.200