मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात हैदराबाद येथे असलेल्या मराठवाडा साहित्य परिषदेचे औरंगाबादला स्थलांतर झाले. त्यामुळे हैदराबादमधील मराठी साहित्यिक वातावरण विचारात घेऊन येथे इ.स. १९५८ मध्ये ’मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश’ या संस्थेची स्थापना झाली. हे करण्यात न्यायमूर्ती गोपाळराव एकबोटे, प्रा. रा.ब. माढेकर, प्रा. भा.शं. कहाळेकर,प्रा. र.म.भुसारी, डॉ. श्रीधरराव कुलकर्णी, श्री. दिवाकर कृष्ण केळकर आदी मंडळी आणि त्यांचे सहकारी यांचा सहभाग होता. ही मंडळी वेगवेगळ्या व्यवसायात होती आणि महाराष्ट्र मंडळ, विवेकवर्धिनी शिक्षण संस्था, मराठी ग्रंथ संग्रहालय आदी संस्थांमध्ये विश्वस्त किंवा पदाधिकारी होती. त्यांपैकी काही लेखक आणि संशोधकही होते. हैदराबादच्या या मराठी साहित्य परिषदेच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असलेले द.पं. जोशी (१९३२-२०११) यांनी सुमारे ४० वर्षे परिषदेची कार्यपताका फडकवत ठेवली होती.

आंध्र प्रदेशची मराठी साहित्य परिषद ’इ.स. १९५८ सालापासून’पंचधारा’ नावाचे त्रैमासिक काढते. हे त्रैमासिक या परिषदेचे मुखपत्र आहे.

या परिषदेला २०२१ सालचा [[मंगेश पाडगांवकर]] भाषासंवर्धक पुरस्कार (२०२१) मिळाला आहे.




(अपूर्ण)