Jump to content

मराठा इतिहास संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मराठा इतिहास संग्रहालय पुण्याच्या डेक्कन कॉलेज मधील संग्रहालय आहे. हे इ.स. १९३९ साली स्थापन झाले. मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित १८व्या आणि १९व्या शतकातील दुर्मीळ कागदपत्रे येथे जतन केली आहेत. साताऱ्याचे रायबहादुर पारसनीस यांनी मराठ्यांच्या इतिहासावर प्रकाश टाकणारी कागदपत्रे संपूर्ण भारतातून गोळा केली म्हणून या संग्रहालयातील वस्तुसंग्रह पारसनीस कलेक्शन म्हणून ओळ्खला जातो.

या संग्रहालयात पारसनीस कलेक्शनखेरीज मराठ्यांच्या इतिहासाचा परिचय करून देणारी मध्ययुगीन काळातील आयुधे, मोडी कागदपत्रे, ताम्रपट, तसेच अन्य ऐतिहासिक वस्तूही पहावयास मिळतात.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ डेक्कन कॉलेज अधिकृत संकेतस्थळ. "Maratha History Museum". www.dcpune.ac.in. 2019-04-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २५ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.