मंजम्मा जोगती
मंजम्मा जोगती | |
---|---|
जन्म |
मंजुनाथ शेट्टी १८ एप्रिल, १९६४ कल्लुकंब, बल्लारी, कर्नाटक |
नागरिकत्व | भारतीय |
पुरस्कार | राज्योत्सव पुरस्कार २०१०, पद्मश्री २०२१ |
मंजम्मा जोगती (जन्म : मंजुनाथ शेट्टी , १८ एप्रिल १९६४), ह्या एक भारतीय कन्नड रंगभूमि अभिनेत्री, उत्तर कर्नाटकातील लोकनृत्य ,जोगती नृत्य, याच्या गायिका आणि नृत्यांगना आहे. २०१९ मध्ये, मंजम्मा लोककलांसाठी राज्यातील सर्वोच्च संस्था, कर्नाटक जानपद अकादमी, याचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या पारलिंगी महिला झाल्या. [१] [२] [३] जानेवारी २०२१ मध्ये, भारत सरकारने लोककलांच्या क्षेत्रातील योगदानासाठी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला. [४] [५]
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
प्रारंभिक जीवन
[संपादन]मांजम्मांचा जन्म मंजुनाथ शेट्टी म्हणून बल्लारी जिल्ह्यातील कल्लुकांबा गावात हनुमंतय्या आणि जयलक्ष्मी यांच्या पोटी झाला. [६] त्यांनी दावणगेरे येथे एसएसएलसीचे शिक्षण घेतले. १९७५ मध्ये, शेट्टीचे पालक त्यांना जोगप्पा म्हणून अभिषेक (एक विधी ज्यात भक्त स्वतःला देवाशी विवाहित मानतात) करण्यासाठी होस्पेट जवळच्या हुलिगेम्मा मंदिरात घेऊन गेले. या विधी पासून शेट्टी स्वतःला महिला म्हणून ओळखू लागल्या आणि त्यांनी मंजम्मा जोगती हे नाव स्वीकारले.
वयाच्या सोळाव्या वर्षी मुलीसारखे वागत असल्याने त्यांना त्याच्या कुटुंबातून काढून टाकण्यात आले. मंजम्मा भाड्याच्या खोलीत राहायला गेल्या आणि रस्त्यावर साडी नेसून भीक मागू लागल्या. त्यांनी दावणगेरे बसस्थानकावर एका पिता-पुत्र जोडीचे जोगती नृत्य बघितले आणि ते शिकण्यासाठी मंजम्मा गटात सामील झाल्या. शिक्षण आणि कार्यक्रम करत एका वर्षानंतर गटातील एका सदस्याने मांजम्मांची हगरीबोम्मनहळ्ळी येथील काळव्वा जोगती नृत्याशी ओळख करून दिली.
कारकीर्द
[संपादन]- रंगमंच
राज्यभर गाजवणाऱ्या काळव्वाच्या जोगती नृत्यगटात मंजम्मा कायमच्या नृत्यांगना झाल्या. [७] कालव्वाच्या मृत्यूनंतर, त्यांने मंडळाची धुरा सांभाळली आणि लोकांमध्ये नृत्य लोकप्रिय केले. २०१० मध्ये, मंजम्माला कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार मिळाला .
कर्नाटक जानपद अकादमीचे प्रमुख
[संपादन]राज्य सरकारने मांजम्मांना प्रथम कर्नाटक जानपद अकादमीच्या सदस्या म्हणून आणि नंतर त्याच संस्थेच्या अध्यक्षा म्हणून त्यांची नियुक्ती केली, ज्यामुळे त्या राज्यातील कला प्रदर्शनासाठी सर्वोच्च संस्थेच्या पहिल्या पारलिंगी महिला प्रमुख बनल्या. [८]
पुरस्कार
[संपादन]- २०२१ - पद्मश्री - भारत सरकारचा चौथा सर्वोच्च नागरी पुरस्कार
- २०१० - कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार [९]
- कर्नाटक फोकलोर युनिव्हर्सिटी आणि कर्नाटक राज्य महिला विद्यापीठाच्या बॅचलर ऑफ आर्ट्सच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांसाठी मंजम्मा यांची जीवनकथा जोडली गेली आहे. [१०] [११]
संदर्भ
[संपादन]- ^ Archana Nathan (15 Nov 2019). "Meet Manjamma Jogati: The first trans-president of the Karnataka Janapada Academy". The Hindu Business Line. 16 Jan 2021 रोजी पाहिले.
- ^ Theja Ram (20 Nov 2020). "A house for Manjamma: Crowdfunding campaign for a trans woman leader in Karnataka". The News Minute. 16 Jan 2021 रोजी पाहिले.
- ^ Asmita Bhakshi (9 Nov 2020). "The unstoppable dance of Manjamma Jogati". Live Mint.com. 16 Jan 2021 रोजी पाहिले.
- ^ "ಪದ್ಮ ಪುರಸ್ಕಾರಗಳು" [Padma Awards]. Prajavani (Kannada भाषेत). 25 January 2021. 25 January 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "List of Pamda awardees". The Hindu. 25 January 2021. 26 January 2021 रोजी पाहिले.
- ^ "ಹರಿದ ಉಡದಾರ ನನ್ನನ್ನು ಹೆಣ್ಣಾಗಿಸಿತು!: ಮಂಜಮ್ಮ ಜೋಗತಿ". Prajavani (Kannada भाषेत). 16 Feb 2020. 16 Jan 2021 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "A place to call home". The New Indian Express. 30 Nov 2020. 16 Jan 2021 रोजी पाहिले.
- ^ "Manjamma Jogati first transwoman to head an academy in Karnataka". The Hindu. 16 Oct 2019. 16 Jan 2021 रोजी पाहिले.
- ^ "Rajyotsava Awards". Official Government Website. 16 Jan 2021 रोजी पाहिले.
- ^ "ಜಾನಪದ ಅಕಾಡೆಮಿ ಅಧ್ಯಕ್ಷೆಯಾಗಿ ನೇಮಕವಾಗಿರುವ ಮೊದಲ ತೃತೀಯ ಲಿಂಗಿ ಜೋಗತಿ ಮಂಜಮ್ಮ!". Kannada Prabha. 17 Oct 2019. 16 Jan 2021 रोजी पाहिले.
- ^ Rashmi Patil (15 Nov 2020). "Why you should read about transgender folk artist Manjamma Jogathi's life in this Kannada book". Edexlive. 16 Jan 2021 रोजी पाहिले.