भ्रूणहत्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

गर्भारपणाच्या विशिष्ट मुदतीनंतर केल्या जाणाऱ्या गर्भपातास भ्रूणहत्या म्हणतात. स्त्री गर्भलिंग निदान करून गर्भपात करणे याला स्त्री भ्रूणहत्या संबोधले जाते.

भ्रूणहत्या संबंधीत सरकारी नियमानुसार सुचना

भारतातील लिंगप्रमाणात लोकसंख्या[संपादन]

१९०१ साली ९७२ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती. २००१ साली ९३३ स्त्रियांची संख्या प्रति १००० पुरुष होती.

भारत सरकार कडून बदल[संपादन]

प्रसव पुर्व परिक्षणतंत्र कायद्याच्या अन्वये गर्भलिंग निदानावर बंदी घालण्यात आली आहे.

अलीकडील बदल[संपादन]

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी भारत सरकार कडून सर्व सोनोग्राफी सेंटरवर "सायलेंट ऑब्झर्व्हर मशीन' बसविले जाणार आहे. हे यंत्र सोनोग्राफी यंत्रावर बसविले जाईल. त्याद्वारे संबंधित डॉक्‍टरने स्त्री भ्रूण असल्याची तपासणी केली का? याची नोंद होणार आहे. त्याशिवाय प्रत्येक तपासणीची नोंद होईल. त्या आधारे जिल्हा रुग्णालयाचा पथकाला संबंधित डॉक्टरांवर कारवाई करणे सोयीचे होणार असून, स्त्री भ्रूणहत्या थांबण्यास मदत होईल.Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.