भोवत्या (पक्षी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भोवत्या

भोवत्या, मजला शिखरा,मशिक्र, जळाट किंवा कहर (इंग्लिश: Pale Harrer; हिंदी: पत्तई, मटिया, गिरगिटमार) हा एक पक्षी आहे.

भोवत्या आकाराने घारीपेक्षा लहान असतो. त्याचा बाज पिवळट राखी करडा असतो. त्याचे पंख अरुंद असतात. पंखांची टोके काळी असतात व उडताना पंख ठळकपणे दिसतात.लांबट शेपटी असून त्यावर तीवर करड्या रंगाच्या आडव्या कड्या असतात.मादीचा रंग उदी असतो.डोक्याचा रंग बदामी असतो.शेतातल्या उभ्या पिकांव्रून, तसेच कुरणांवरून सुंदर एकाकी उडताना दिसतो.भोवत्या भारत,नेपाळ,श्रीलंका,मालदीव,आणि लक्षद्वीप तसेच अंदमान बेटात हिवाळी पाहुणे असतात. भोवत्या पूर्व युरोप ते पश्चिम आशियात आढळतात.भोवत्या माळरानावर जास्त प्रमाणात दिसून येतो.

संदर्भ[संपादन]

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली