भोवत्या

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
भोवत्या
भोवत्या

भोवत्या याचे इंग्रजी नाव pale harrier असे नाव आहे.मराठीत मजला शिखरा,शिकरा,जळाट,आडेर,कहार,पिलानी घार,भोत्या,भोवत्या,सताना,हारिण,सरडामारी चचाण असे म्हणतात.हिंदीत गिरगीटमार,दस्तमल,मटीया गिरगीटमार असे म्हणतात.

ओळख[संपादन]

आकाराने घारीपेक्षा लहान असतो.पिवळट राखी करडा बाज लांब अरुंद पंख,पंखाची टोके काळी असतात.उडताना पंख ठळक दिसतात.लांबट शेपटी त्यावर करडया रंगाच्या आडव्या काडया असतात.मादीचा रंग उदी असतो.घुबडासारखे दिसणारे डोके,डोक्याचा रंग बदामी असतो.शेतातल्या उभ्या पिकांवरून,तसेच,कुरणांवरून उडताना दिसतो.

वितरण

भारत,नेपाळ,श्रीलंका,मालदीव आणि लक्ष्यद्वीप,तसेच अंदमान बेटांत हिवाळी पाहुणे.पूर्व युरोप ते पश्चिम आशियात वीण.

निवासस्थाने माळराने.

माॅन्टग्यूचा भोवत्या[संपादन]

याला इंग्रजीमध्ये montagu harrier असे नाव आहे.हिंदीत गिरगिटमार,दस्तमल,पतई,सफेद गिरगिटमार असे म्हणतात.

मॉन्टग्यूचा भोवत्या

ओळख[संपादन]

वरील भाग गर्द राखी रंगाचा असतो.पाणघारीपेक्षा लहान.पंख अरुंद टोकदार असतात.शेपटीजवळचा भाग पांढरा असतो.पोटाखालून पांढरा त्यावर काळसर लाल पट्ट्ये असतात.

वितरण

हिवाळी पाहुणे,भारत,नेपाळ,श्रीलंका,मालदीव,लक्षद्वीप आणि अंदमान बेटे.

निवासस्थाने

दलदली,पठारी,गवती कुरणे आणि शेती

संदर्भ[संपादन]

पक्षिकोश लेखकाचे नाव - मारुती चितमपल्ली