भोजे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भोजे हे जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा तालुक्यातील एक गाव आहे. या गावाच्या शेजारी वरखेडी व पिंपळगाव हरेश्वर ही मोठे गावे आहेत. या गावात पाचोरा तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा आहेत. भोजे हे गाव बहुळा नदीच्या काठावर वसले असून शेजारीच चिंचपुरे नावाचे खेडे आहे. ही दोन्ही गावे एकत्रपणे भोजे-चिंचपुरे म्हणून पंचक्रोशीत माहीत आहेत. गावाची लोकसंख्या जवळपास ४५०० असून साक्षरतेचे प्रमाण ७५% आहे. शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय असून कापूस, मोसंबीमका ही प्रमुख पिके आहेत.

स्थान[संपादन]

भोजे पाचोरा ते पिंपळगाव मार्गावरचे खेडे आहे. जवळचे रेल्वे स्थानक पाचोरा असून, तेथून दर २० मिनिटांनी भोजे येथे येण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस उपलब्ध आहेत. भोजे हे नैसर्गिकदृष्ट्या संपन्न खेडे आहे.

विशेष[संपादन]

भोजे येथे सॉ मिल (लाकूड उद्योग) व वेल्डिंग आणि बॉडी मेकिंग (तीन चाकी व चार चाकी वाहनांची कंटेनर बांधणी) हे उद्योग आहेत.

भोजे ग्रामपंचायत ही २००३ साली झालेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात महाराष्ट्रातून दुसऱ्या क्रमांकाने विजयी झाली होती..

शैक्षणिक[संपादन]

  • जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदिर
  • पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे 'महात्मा फुले हायस्कूल'