Jump to content

भूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी)
स्थापना एप्रिल २००३
मुख्यालय भूतान
राजकीय तत्त्वे

साम्यवाद (मार्क्सवाद-लेनिनवाद), माओवाद

लोकशाही
राष्ट्रीय आघाडी भूतान
रंग लाल
पक्ष ध्वज
भूतान

भूतान कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स-लेनिन-माओवादी) हा भूतान मधला एक बंदी घातली असलेला राजकीय पक्ष आहे.

भूकपा (मालेमा) हे एका नव लोकशाही क्रांतीची मागणी करते व भूतानातील राजेशाही व वांगचुक घराण्याचे पाडाव करण्याचे भाष्य करते. त्यांच्या सैनी दलाचे नाव 'भूतान टायगर फोर्स' आहे. सध्या पक्षात अंदाजे ६०० - १००० सदस्य आहेत.[] भूतान सरकार द्वारा पक्षावर बंदी घालण्यात आलेली आहे.[]

इतिहास

[संपादन]

१९९० च्या दशकात भूतानातील नेपाळी बोलणाऱ्या लोकांने लोकशाहीकरण व स्वीकृत भाषा बदलांसाठी भूतान सरकार विरुद्ध आंदोलन केले. सरकारने जब्रण ह्या लोकांना बंदीत घातले, व त्यांना पूर्व नेपाळातील निर्वासित तळांमध्ये ठेवले. जे भूतानातच राहिले त्यांना मोठ्या पातळीवर भेदभावाला सामोरे जावे लागले. त्या निर्वासित तळांमध्ये बंडखोर गट जन्माला आले, ज्यापैकी एक भूकपा (मालेमा) आहे.[] भूकपा (मालेमा) ह्याचे संस्थापन २२ एप्रिल २००३ला झाले ज्याची बातमी नेपाळची कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) ह्यांची संकेतस्थळावर आली.[]

कालक्रम

[संपादन]
२००३

भूकपा (मालेमा) हे नेकपामा ह्यांच्या संकेतस्थळावर २२ एप्रिल २००३ रोजी आले.

२००७

रॉयल भूतान सैन्याने भूकपा (मालेमा) ने भारत सिमे जवळील फुएंतशोलिंग गावला लावलेला बॉम्ब ढवळला.[]

२००८

२००८ साली घटनात्मक राजेशाही मध्ये संक्रमण होत असतांना पक्षाच्या माओवाद्यांनी भूतानात ५ स्फोट केले, ज्या मधला एक राजधानी ठीम्पू येथे झाला. त्यांने 'लोकांचे युद्ध' सुरू झाल्याचे जाहीर केले.[]

मार्च २००८ साली भूतानातील पोलीसने ५ आरोपी माववाद्यांना ठार केले व १७ इथारांना दाक्षिणात अटक केली.[] डिसेंबर ३० २००८ला माओवाद्यांनी गनिमी कावा करत ४ वन सैनिकांना ठार केले व त्यांचे हत्यार घेतले. ही घटना सिंग्ये झोंग, जे कि राजधानीच्या २५० किमी दूर आहे, येथे झाली.[]

२००९

एका भूतानी पत्रकाराला माओवादी असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली.[]

२०१०
[संपादन]

१६ व्या दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटनेच्या भेटीच्या वेळेस माववाद्यांच्या धमक्यांमुळे सुरक्षा घट्ट करण्यात आली.[]

विचारधारा

[संपादन]

पक्षाची पहिली रचना एका दहा मुद्द्याच्या क्रमाची होती जी त्यांची सरकारकडे मागणी होती.[] पक्षाची विचारधारा माओवादी आहे व ते लोकांचे युद्ध व नव लोकशाही क्रांती करण्याची मागणी करतात.

पक्ष नेपाळी निर्वासितांचा प्रत्यावार्तानाची मागणी करतात. ते भूतानला एक स्वतंत्र लोकशाही व गणतंत्र बनवण्याची इच्छा व्यक्त करतात.[][१०]

आंतरराष्ट्रीय संबंध

[संपादन]

भूतानी माववाद्यांचे संबंध नेपाळी माववाद्यांशी आहे ज्यांना ते आपले प्रेरणास्थान मानतात.[१०]

त्यांने भारतीय उत्तर पूर्व नक्षलवाद्यानसोबतही संबंध केले आहे व त्यांच्या कडून बॉम्ब बनवणे व इतर प्रशिक्षण ते घेतात.[११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ [१] : Global Post : The Bhutan Insurgencies
  2. ^ a b c [२]: Bhutan Assesment 2008
  3. ^ [३] : Reuters : Bhutan tolerate democracy but not dissent
  4. ^ [४] : Tight security in Bhutan after Bomb found
  5. ^ a b [५] : Maoists killed by Bhutan Police
  6. ^ [६] : Communist guerillas kill four Bhutanese forest guards
  7. ^ [७] : Bhutanese reporter imprisoned
  8. ^ [८] : Bhutan's problem with Maoist insurgency groups
  9. ^ [९]: Archive : The ideology
  10. ^ a b [१०] Archived 2011-09-05 at the Wayback Machine.: Rise of red army in the last Shrangi - La
  11. ^ [११] : India - Bhutan rebel links exposed