भीष्मकनगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

भीष्मकनगर हे अरुणाचल प्रदेशातील २५०० एकर परिसरात वसलेले एक गाव आहे. हे गाव दिबांग घाटी या जिल्ह्यात येते. आहे. भीष्मकनगरपासून २५ किलोमीटरवर रोइंग हे शहर व ३७७ किमीवर इटानगर आहे.

भीष्मकनगर येथे उत्खननात सापडलेल्या वस्तू

जवळची पर्यटन स्थळे[संपादन]

भीष्मकनगर येथून ५ किलोमीटरवर आकाशगंगा नावाचा धबधबा आहे, तर १० किलोमीटर अंतरावर ताम्रेश्वरी देवीचे मंदिर आहे. गावापासून काही किलोमीटरवर माउलिंग राष्ट्रीय उद्यान, सिर्की धबधबा असून आचल घाट हा परिसरही आहे. रोइंगपासून ५६ किलोमीटरवर असणारे मायोदिया हे गिरिस्थान आहे.[१]

भीष्मकनगर येथील उत्खननातील भिंतीचे अवशेष

उत्खनन[संपादन]

भीष्मकनगर येथे एक उत्खनन करण्यात आले होते. या उत्खननात इंद्र, ऐरावत, नंदी, सूर्य यांची शिल्पे सापडली. या उत्खननात १२ व्या शतकात बांधलेला १८७० चौरस मी क्षेत्रफळाचा एक विटांचा राजवाडा सापडला आहे. येथेच चौदाव्या शतकात बांधलेल्या एका किल्ल्याचे अवशेष सापडले आहेत. या वास्तू बाराव्या ते सोळाव्या शतकात या भागावर राज्य केलेल्या 'चुटिया' राजघराण्याने बांधल्या असल्याची शक्यता वर्तवली जाते. [१]

संदर्भ[संपादन]

  1. a b भावे, शशिधर (तिसरी आवृत्ती - २०१३). मनोभावे देशदर्शन अरुणाचल प्रदेश. पुणे: राजहंस प्रकाशन पुणे. pp. ५५. ISBN 978-81-7434-411-3. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)