भाविना पटेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भाविना हसमुखभाई पटेल
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक ६ नोव्हेंबर, १९८६ (1986-11-06) (वय: ३७)
जन्मस्थान सुन्धिया, वडनगर, मेहसाणा जिल्हा, गुजरात
खेळ
देश भारत
खेळ टेबल टेनिस
कामगिरी व किताब
पॅरालिंपिक स्तर २०२० उन्हाळी टोकियो, जपान
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी २०२० टोकियो पॅरालिंपिकमध्ये रौप्यपदक


भाविना हसमुखभाई पटेल (६ नोव्हेंबर १९८६) ही एक भारतीय पॅराॲथलीट आणि टेबल टेनिस खेळाडू आहे.[१] ती मेहसाणा, गुजरात येथे राहते. तिने टोकियो येथे २०२० च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये वर्ग 4 टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले.[२] निकुल पटेल हे तिचे प्रशिक्षक आहेत.[३]

कारकीर्द[संपादन]

व्हीलचेअरवर बसून टेबल टेनिस खेळणाऱ्या भाविनाने  राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक सुवर्ण आणि रौप्य पदके जिंकली आहेत.

२०११ मध्ये आयोजित पीटीटी थायलंड टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये वैयक्तिक श्रेणीमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकून तिने जागतिक क्रमांक २ चेरँकिंग गाठले.  ऑक्टोबर २०१३ मध्ये, पटेलने बीजिंगमधील आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये महिला एकेरीच्या वर्ग 4 मध्ये रौप्य पदक जिंकले.

२३ ते ३१ ऑगस्ट २०१७ रोजी बीजिंग, चीन येथे भाविनाने आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस फेडरेशन आशियाई पॅरा टेबल टेनिस चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.

टोकियो २०२० पॅरालिम्पिक[संपादन]

टोकियो २०२० पॅरालिम्पिकमध्ये तिने जागतिक क्रमांक २ वर असलेल्या आणि रिओ पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेत्या बोरिस्लावा रॅन्कोविचला पराभूत करून महिला एकेरीच्या वर्ग ४ वर्गात उपांत्य फेरी गाठली. तिने अंतिम फेरी गाठण्यासाठी चीनच्या झांग मियाओलाही पराभूत केले आणि सध्याच्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या झोउ यिंगच्या विरोधात ती सुवर्णपदक लढतीत हरली आणि तिला टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

पुरस्कार[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Table Tennis PATEL Bhavinaben Hasmukhbhai - Tokyo 2020 Paralympics" Check |url= value (सहाय्य). .. (इंग्रजी भाषेत). 2021-08-29 रोजी पाहिले.[permanent dead link]
  2. ^ "bhavina patel : पॅरालिम्पिकमध्ये भाविना पटेलने रचला इतिहास, टेबल टेनिसमध्ये रौप्य पदक जिंकले". Maharashtra Times. 2021-08-29 रोजी पाहिले.
  3. ^ World, Republic. "Bhavina Patel's coach confident of bagging medal for India at Tokyo Paralympics finals". Republic World (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2021-08-28. 2021-08-29 रोजी पाहिले.
  4. ^ "National Sports Awards 2021 announced". pib.gov.in. 2021-11-20 रोजी पाहिले.