Jump to content

भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित
उद्योग क्षेत्र सार्वजनिक वाहतूक
स्थापना २०१२
मुख्यालय नवी दिल्ली, भारत
सेवा द्रुतगती रेल्वे
मालक भारत सरकार
पालक कंपनी रेल विकास निगम लिमिटेड
संकेतस्थळ hsrc.in

भारतीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित ही एक विशिष्ट प्रयोजन महामंडळ आहे जी २०१२ मध्ये भारत सरकारच्या सार्वजनिक क्षेत्रातील रेल विकास निगम लिमिटेडची अनुषंगी कंपनी म्हणून समाविष्ट केली गेली आहे. एया कंपनीची भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयांतर्गत भारतात द्रुतगती रेल्वेमार्गाचा विकास आणि अंमलबजावणी करण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे.

प्रकल्प

[संपादन]

मुंबई - अहमदाबाद द्रुतगती रेल्वेमार्ग

[संपादन]

राष्ट्रीय द्रुतगती रेल्वे महामंडळ मर्यादित या मार्गाची अंमलबजावणी करीत आहे आणि बांधकाम एप्रिल २०२० पर्यंत सुरू होण्याची शक्यता असून प्रकल्प २०२२ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. रेल्वेमार्गाच्या चलसांचासाठी जपान रेलवे शिन्कानसेन ई ५ मालिका इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट वापरेल.

हीरक चतुर्भुज

[संपादन]

२०२० पर्यंत हीरक चतुर्भुज मार्गांच्या व्यवहार्यतेच्या अभ्यासासाठी कंत्राट देण्यात आले आहेत. यात ३ टप्पे असतील:[]

  • दिल्ली-मुंबई
  • मुंबई-चेन्नई
  • दिल्ली-कोलकाता

दिल्ली - चंदीगड - अमृतसर द्रुतगती रेल्वेमार्ग

[संपादन]

या द्रुतगती रेल्वेमार्गाचा पूर्व-व्यवहार्यता अभ्यास सुरू आहे. अंतरिम अहवाल २०१५ मध्ये सिस्ट्राने सादर केला होता.[]

दिल्ली - चेन्नई द्रुतगती रेल्वेमार्ग

[संपादन]

या मार्गाचे २ टप्पे असतील. पहिल्या टप्प्यात, दिल्ली-नागपूर विभागाच्या व्यवहार्यतेचा अभ्यास सुरू आहे.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Welcome to HSRC". hsrc.in. 2020-02-14 रोजी पाहिले.
  2. ^ "Welcome to HSRC". hsrc.in. 2020-02-14 रोजी पाहिले.
  3. ^ "Welcome to HSRC". hsrc.in. 2020-02-14 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]