जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप
Appearance
(भलीमोठी मीटरवेव्ह रेडिओ दुर्बीण या पानावरून पुनर्निर्देशित)
जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप | |
नारायणगाव येथील एक ॲंटेना | |
संस्था | नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स |
---|---|
स्थळ | नारायणगाव पासून १० किमी पूर्वेला, भारत |
तरंगलांबी | रेडिओ तरंग ५० ते १५०० मेगाहर्ट्झ |
स्थापना | १९९५ |
दूरदर्शक श्रेणी | ३० पॅराबोलिक ॲंटेनांची शृंखला |
व्यास | ४५ मी |
कोनीय विभेदन | कमी वारंवारतेला ६०" १.४ गिगाहर्ट्झ वारंवारतेला २" |
संग्रहण क्षेत्रफळ | ४७,७१३ मी२ |
माऊंट | alt-azimuth fully steerable primary |
संकेतस्थळ | http://www.gmrt.ncra.tifr.res.in |
जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (महाकाय मीटरतरंग रेडिओ दुर्बीण.) (लघुरूप: जी.एम.आर.टी.; इंग्लिश: Giant Metrewave Radio Telescope ;) हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातील खोडद (अक्षांश: १९.०९६५१७ उ.; रेखांश: ७४.०४९७४२ पू.) येथील पॅराबोलिक आकाराच्या तारांच्या जाळ्यांच्या स्वरूपातलल्या दुर्बिणींचा समूह आहे. येथे एकूण मिळून ३० दुर्बिणी आहेत. यांतल्या काही दुर्बिणींचा व्यास ४५ मीटर आहे. .
जी.एम.आर.टी. मुख्यतः कमी ऊर्जेच्या रेडिओ लहरींसाठी बनवली आहे. जी.एम.आर.टी.मध्ये ५० मेगाहर्ट्झ ते १४२० मेगाहर्ट्झ या वर्णपटातल्या लहरींचा अभ्यास होतो.
बाह्य दुवे
[संपादन]- जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप नकाशा (इंग्लिश मजकूर)