ब्रेस्त, बेलारूस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ब्रेस्त
Брэст
बेलारूसमधील शहर


ध्वज
चिन्ह
ब्रेस्त is located in बेलारूस
ब्रेस्त
ब्रेस्त
ब्रेस्तचे बेलारूसमधील स्थान

गुणक: 52°8′N 23°40′E / 52.133°N 23.667°E / 52.133; 23.667

देश बेलारूस ध्वज बेलारूस
प्रदेश ब्रेस्त
स्थापना वर्ष इ.स. १०१९
क्षेत्रफळ १४५ चौ. किमी (५६ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ९२० फूट (२८० मी)
लोकसंख्या  (२०१४)
  - शहर १९,२१,८०७
  - महानगर ३,३०,९३४
प्रमाणवेळ यूटीसी+०३:००
city.brest.by


इस्रायलचा भूतपूर्व पंतप्रधान मेनाकेम बेगिन ह्याचा जन्म ब्रेस्त येथेच झाला होता.

ब्रेस्त (बेलारूशियन: Брэст, रशियन: Брест, यिडिश: בריסק, युक्रेनियन: Брест, पोलिश: Brześć) हे पूर्व युरोपातील बेलारूस देशामधील ब्रेस्त प्रदेशाची राजधानी व मोठे शहर आहे. बेलारूसच्या पश्चिम भागात पोलंड देशाच्या सीमेवर वसलेल्या ब्रेस्त शहराची लोकसंख्या सुमारे ३.३ लाख आहे. मध्य युगीन काळात पोलिश-लिथुएनियन राष्ट्रकुलाच्या तर इ.स. १७९३ पासून रशियन साम्राज्याच्या अधिपत्याखाली असलेले ब्रेस्त पहिल्या महायुद्धानंतर पोलंडचा भाग बनले. दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीने ब्रेस्तवर कब्जा मिळवला. युद्ध संपल्यानंतर ब्रेस्त सोव्हिएत संघामधील बेलारूशियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्यामध्ये सामील करण्यात आले.

१९९१ सालच्या सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर ब्रेस्त बेलारूस देशाचा भाग आहे.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: