ब्रदर इंडस्ट्रीज
१९८२ पासून असलेला लोगो | |
ब्रदर इंडस्ट्रीजचे मुख्यालय | |
स्थानिक नाव | ブラザー工業株式会社 |
---|---|
प्रकार | सार्वजनिक कंपनी |
शेअर बाजारातील नाव | साचा:तोक्यो स्टॉक |
उद्योग क्षेत्र | प्रिंटर, यंत्रसामग्री |
स्थापना | 1908 | (यासुई सिव्हिंग मशीन कंपनी नावाने)
संस्थापक | कानकेची यासुई |
सेवांतर्गत प्रदेश | जगभर |
महत्त्वाच्या व्यक्ती | तोशिकाझू कोइके (अध्यक्ष) इचिरो सासाकी (अध्यक्ष) |
उत्पादने | प्रिंटर, मल्टीफंक्शन प्रिंटर, डेस्कटॉप संगणक, ग्राहक आणि औद्योगिक शिवणकाम यंत्रे, मोठ्या यंत्राचे लेबल, प्रिंटर, टायपराइटर, फॅक्स मशीन आणि इतर संगणक - संबंधित इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा, मशीन टूल्स |
कर्मचारी | ३१,३१४ |
संकेतस्थळ |
global |
ब्रदर इंडस्ट्रीज लिमिटेड (ブラザー工業株式会社 ) ही एक जपानी बहुराष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि विद्युत उपकरणे तयार करणारी कंपनी आहे.[१] याचे मुख्यालय नागोया जपान येथे आहे. त्याच्या उत्पादनांमध्ये प्रिंटर, मल्टीफंक्शन प्रिंटर, डेस्कटॉप संगणक, ग्राहक आणि औद्योगिक शिवणकाम यंत्रे, मोठ्या यंत्राचे लेबल, प्रिंटर, टायपराइटर, फॅक्स मशीन आणि इतर संगणक - संबंधित इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांचा समावेश आहे. ब्रदर इंडस्ट्रीज त्याच्या स्वतःच्या नावाने आणि इतर कंपन्यांशी केलेल्या ओईएम करारांनुसार त्याच्या उत्पादनांचे वितरण करतो.
इतिहास
[संपादन]ब्रदर इंडस्ट्रीजची सुरुवात १९०८ मध्ये झाली. याचे आधीचे नाव यासुई सिव्हिंग मशीन कंपनी असे होते. ते नागोया जपान येथे स्थित होते.[२] १९५५ मध्ये, ब्रदर इंटरनॅशनल कॉर्पोरेशन (यूएस) या नावाने त्यांच्या पहिल्या परदेशी विक्री संलग्न कंपनीची स्थापना झाली. १९५८ मध्ये डब्लिन शहरात युरोपियन प्रादेशिक विक्री कंपनी स्थापन करण्यात आली. यानंतर कंपनीचे नाव बदलून ब्रदर इंडस्ट्रीज लिमिटेड असे करण्यात आले. १९६२ मध्ये. ब्रदर इंडस्ट्रीजने सेंट्रोनिक्स कंपनीबरोबर मिळून प्रिंटर मार्केटमध्ये प्रवेश केला.[३]
१९६८ मध्ये कंपनीने आपले यूके मुख्यालय ऑडेंशॉ, मँचेस्टर येथे हलविले. त्या आधी जोन्स सिव्हिंग मशीन कंपनीला त्यांनी काबीज केले. ती कंपनी बरीच जुनी अशी ब्रिटिश शिवणकामाचे यंत्र बनवणारी कंपनी होती.[४]
मार्च २००५ मध्ये, " ब्रदर कम्युनिकेशन स्पेस "(आता ब्रदर संग्रहालय) नावाचे एक कॉर्पोरेट संग्रहालय नागोयामध्ये उघडले. ते जनसंपर्क सुविधा म्हणून देखील कार्य करते.
डिसेंबर २०११ मध्ये, ब्रदरने आपल्या ऑफरमध्ये विविधता आणली. नेफसिस, वेब आधारित रिमोट कोलाबोरेशन आणि कॉन्फरन्सिंग सॉफ्टवेअरमध्ये काम करणारी कंपनी त्यांनी काबीज केली.[५]
नोव्हेंबर २०१२ मध्ये, ब्रदरने जाहीर केले की त्याने उत्तर वेल्सच्या कारखान्यात यूकेमध्ये बनविलेले शेवटचे टाइपराइटर तयार केले आहे. त्यानंतर त्यांनी टाइपराइटर बनवणे बंद केले. १९८५ मध्ये उघडल्यापासून त्यांनी आपल्या रेक्सहॅम कारखान्यात ५९ लाख टाइपराइटर बनवले होते. ब्रदरने शेवटची मशीन लंडनच्या विज्ञान संग्रहालयाला दान केली.[६]
३१ मार्च २०२० पर्यंत, ब्रदर कंपनीची वार्षिक विक्री महसूल ६,३७,२५९ दशलक्ष येन (ऑक्टोबर २०२० पर्यंत ६,०४४,६६६,७१० अमेरिकन डॉलर्स) पर्यंत पोहोचली होती.[७]
इतर उत्पादने
[संपादन]१९६० च्या दशकात ब्रदर इंडस्ट्रीजने प्रिंटर मध्ये विविध प्रकारचे प्रिंटर बनवले उदा: लेबल प्रिंटर, एमएफसी, गारमेंट प्रिंटर, संगीत अनुक्रमक, मॅन्युफॅक्चरिंग/मशीन टूल्स, आणि जॉयसाऊंड काराओके.
जाहिरात आणि प्रायोजकत्व
[संपादन]ब्रदर इंडस्ट्रीजने १९८७ ते १९९९ पर्यंत मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लब प्रायोजित केला. हा कालावधी कोणत्याही इंग्रजी फुटबॉल क्लबच्या सर्वात लांब अखंड प्रायोजक सौद्यांपैकी एक मानला जातो.[२]
ब्रदर इंडस्ट्रीजने २०१० च्या शरद ऋतूतील त्यांच्या ए-३ प्रिंटर श्रेणीसाठी त्यांची पहिली एकात्मिक, पॅन युरोपियन जाहिरात मोहीम सुरू केली.
२०१९ मध्ये ब्रदर इंडस्ट्रीजची यूकेची सहाय्यक कंपनी विटस प्रो सायकलिंग टीमची सह-प्रायोजक बनली. त्यानंतर संघाचे नाव अधिकृतपणे "विटस प्रो सायक्लिंग टीम, पॉवर बाय ब्रदर यूके"बनले.[८]
संदर्भ
[संपादन]- ^ "Brother Corporate Data". 4 October 2012 रोजी पाहिले.
- ^ a b Stuart D.B. Picken (19 December 2016). Historical Dictionary of Japanese Business. Rowman & Littlefield Publishers. p. 75. ISBN 978-1-4422-5589-0.
- ^ Brother Industries history
- ^ "History". Brother NORDICS (इस्टोनियन भाषेत). 16 October 2020 रोजी पाहिले.
- ^ "Brother - Nefsis". corumgroup.com. Corum Group. 22 February 2013. 24 July 2014 रोजी पाहिले.
- ^ "UK's 'Last Typewriter' produced". BBC News. 20 November 2012. 23 November 2012 रोजी पाहिले.
- ^ "Corporate Data | Corporate Information | Brother". www.brother.com (इंग्रजी भाषेत). 2 February 2018 रोजी पाहिले.
- ^ Evans, Josh (27 November 2018). "Vitus Pro Cycling's 2019 Vitus ZX1 Team Aero Disc - Gallery". cyclingnews.com. 15 March 2019 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत संकेतस्थळ
- ब्रदर प्रदेश आणि उत्पादन श्रेणी निवडक
- ब्रदर सहयोग आणि डाउनलोड
- "कंपनी विषयक एतिहासिक पुस्तके (शशी)". शशी इन्टरेस्ट ग्रुप. एप्रिल २०१६. — Wiki collection of bibliographic works on Brother Industries.
- "उत्पादन मार्गदर्शक पुस्तके (ब्रदर)". Brother Interest Group. जून २०१९. २९ जून २०२० रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जून २०२० रोजी पाहिले. — Wiki collection of bibliographic works on Brother Installation Procedure.
- CS1 इस्टोनियन-भाषा स्रोत (et)
- जपानी ब्रँड
- तोक्यो स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध कंपन्या
- नागोया येथील उत्पादन कंपन्या
- जपानमधील इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या
- संगणक हार्डवेअर कंपन्या
- संगणक संबंधित कंपन्या
- संगणक प्रिंटर कंपन्या
- संगणक प्रणाली कंपन्या
- शिवणकामाचे यंत्र बनवणारे ब्रॅण्ड
- परिधान करण्यायोग्य संगणक
- जपानमधील मुख्यालय असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्या
- इ.स. १९०८ मध्ये स्थापन झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या
- इ.स. १९०८ मध्ये स्थापन झालेल्या उत्पादन कंपन्या
- इ.स. १९०८ मध्ये स्थापन झालेल्या जपानी कंपन्या