Jump to content

बोमन इराणी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बोम्मन इराणी या पानावरून पुनर्निर्देशित)
बोमन इराणी
बोमन इराणी
जन्म बोमन इराणी
डिसेंबर २, १९५९
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय

बोमन इराणी (डिसेंबर २, इ.स. १९५९:मुंबई - ) हा भारतीय चित्रपट व नाट्यअभिनेता आहे.

बालपण

[संपादन]

इराणीचा जन्म मुंबईमध्ये एका पारशी कुटुंबात झाला. तो सेंट मेरीज स्कूलमध्ये शिकला व मिठीबाई महाविद्यालयातून स्नातक झाला. त्यानंतर त्याने ताज महाल पॅलेस अँड टॉवर या हॉटेलात वेटर आणि हरकाम्या म्हणून नोकरी केली.[] यानंतर तो आपल्या आईबरोबर दक्षिण मुंबईतील नोव्हेल्टी सिनेमाअप्सरा सिनेमा यांच्यामध्ये असलेली वाडवडिलार्जित बेकरी चालवू लागला. त्याचबरोबर त्याने दादरमध्ये अंकल चिप्सचे एक दुकानही काढले पण धंद्यात नुकसान झाल्याने १९८६ च्या सुमारास ते बंद केले.[] १९८७ ते १९८९ दरम्यान त्याने छायाचित्रण शिकून त्याचा धंदा सुरू केला. आजही इराणी व्यावसायिक छायाचित्रकार आहे.

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Boman Irani gets candid[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". Hindustan Times (इंग्लिश भाषेत). 2011-01-21 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-02-20 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Interview with Shekhar Gupta of the Indian Express" (इंग्लिश भाषेत). Indianexpress.com. 2007-07-30. 2011-02-20 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)