बेटेगाव
बेटेगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील गाव आहे.
?बेटेगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | ६.७७७६ चौ. किमी |
जिल्हा | पालघर |
लोकसंख्या • घनता |
२,८३२ (२०११) • ४१८/किमी२ |
सरपंच | |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४०१५०१ • +०२५२५ • महा ४८ |
भाषा मराठी |
भौगोलिक स्थान
[संपादन]हे पालघर शहरापासून १५ किमी अंतरावर वसलेले आहे.बोईसर रेल्वे स्थानकापासून हे गाव ५ किमी अंतरावर आहे. बोईसरला औद्योगिक वसाहत तसेच तारापूर अणुऊर्जा प्रकल्प असल्याने मुंबईवरून गुजरातकडे जाणाऱ्या सर्व मेल, एक्स्प्रेस, प्रवासी आगगाड्या बोईसर ह्या पश्चिम रेल्वेच्या स्थानकावर थांबतात. बोईसरवरून अॉटोरिक्क्षा/डमडमची सोय सुद्धा उपलब्ध आहे.
लोकजीवन
[संपादन]मुख्यतः शेती व्यवसाय असणारे येथील लोक बोईसर औद्योगिक विकास क्षेत्रात नोकरी तसेच उद्योग उपलब्ध झाल्यामुळे शेतीवर अवलंबून न राहता लहान मोठे व्यवसाय सुरू करून स्थिरस्थावर झाले आहेत. येथे नामांकित कंपन्यांनी घरबांधणी प्रकल्प उभे केले आहेत.
संदर्भ
[संपादन]https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२.
http://tourism.gov.in/india-tourism-development-corporation-itdc