Jump to content

बारेंट्स समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बॅरंट्स समुद्र या पानावरून पुनर्निर्देशित)
बारेंट्स समुद्र

बारेंट्स समुद्र (नॉर्वेजियन: Barentshavet, रशियन: Баренцево море) हे आर्क्टिक महासागराचे एक अंग आहे. ह्या समुद्राच्या पश्चिमेला नॉर्वेजियन समुद्र, वायव्येला स्वालबार्ड, उत्तरेला आर्क्टिक महासागर, पूर्वेला अर्खांगेल्स्क ओब्लास्तचा नोवाया झेम्ल्या, ईशान्येला फ्रान्झ जोसेफ द्वीपसमूह तर दक्षिणेला पांढरा समुद्र आहेत. सोळाव्या शतकामधील डच शोधक विलेम बारेंट्स ह्याचे नाव ह्या समुद्राला देण्यात आले आहे.

मध्य युगादरम्यान ह्या समुद्राला मुर्मान समुद्र ह्या नावाने ओळखले जात असे. बारेंट्स समुद्राखाली जीवाष्म इंधनाचे मोठ्या प्रमाणावर साठे आहेत.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: