बुखारेस्टचा तह (१९१३)
१९१३चा बुखारेस्टचा तह बल्गेरिया, रोमेनिया, सर्बिया, मॉंटेनिग्रो आणि ग्रीस यांच्यामधील तह होते.
या तहाप्रमाणे बल्गेरियाला बराच प्रदेश गमवावा लागला. सेर्बियाने मॅसिडोनियातील मोनास्टीर व व्ह्रड॔र खोऱ्याचा प्रदेश लाटला. ग्रीसला जानिना, एपिरस, क्रीट, एजियन समुद्रातील बेटे आणि सालोनिका हा प्रदेश मिळाला. नोविबजारचा भाग सर्बिया आणि मोन्टेनिग्रो यांनी वाटून घेतला. बुखारेस्टच्या तहानंतर २९ सप्टेबर १९१३ रोजी बल्गेरियाने तुर्कस्तानशी तह केला. या तहाप्रमाणे कक॔ किल्सी हा प्रदेश तुर्कस्तानला मिळाला तर दोबृजाचा काही भाग रुमानियाला मिळाला. दुसऱ्या बाल्कन युद्धामुळे बल्गेरियाचे ' विशाल राज्य ' स्थापन करण्याचे स्वप्न तर धुळीला मिळालेच , परंतु आपल्या हक्काचा बराच प्रदेश गमावून मॅसिडोनियाचा एक तुकडा , मध्य थ्रेस आणि एजियन समुद्रातील एक बंदर एवढ्या प्र्देशावर त्याला संतुष्ट व्हावे लागले. दुसऱ्या बाल्कन युद्धामुळे सर्बियाचे सामर्थ्य मात्र वाढले.