बी.के. गोयल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.

डॉ. बी.के. गोयल (इ.स. १९३६ - २० फेब्रुवारी, २०१८:मुंबई, महाराष्ट्र) हे एक जगप्रसिद्ध[ संदर्भ हवा ] हृदयरोगतज्ज्ञ होते. गोयल हे प्रख्यात व्यक्तींबरोबरच तसेच गरीब रुग्णांचेही उपचार करीत. ते शेवटपर्यंत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुख्य हृदयरोगतज्ज्ञ आणि मानद अधिष्ठाता पदावर होते.

डॉ. गोयल हे मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या कार्डियोलॉजी विभागाचे प्रमुख होते. त्यासोबतच ते जे.जे ग्रुप ऑफ हॉस्पिटल आणि मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमध्ये कार्डियोलॉजीचे डायरेक्टर-प्रोफेसर म्हणून काम करीत. अवघ्या २९व्या वर्षी जे. जे. रुग्णालयातील हृदयरोग विभागाचे प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती.[ संदर्भ हवा ]

वैद्यकीय सेवा[संपादन]

गोयल यांनी भारतातील पहिले इंटेन्सिव्ह केअर युनिट [मराठी शब्द सुचवा] आणि मोबाइल कोरोनरी केअर युनिट [मराठी शब्द सुचवा] स्थापन केले. कार्डिओलॉजी सोसायटी ऑफ इंडिया, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स, नॅशनल सोसायटी ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ हार्ट डिसीझेस आणि अमेरिकन कॉलेज ऑफ चेस्ट फिजिशियन्ससह अनेक संस्थामध्ये ते अध्यक्षपदी होते. भारतातील पल्स पोलिओ अभियान, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, इंडो अमेरिकन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी, हार्ट फाऊंडेशन ऑफ इंडिया, इंडियन कॉलेज ऑफ कार्डिओलाॅजी, धन्वंतरी फाऊंडेशन येथेही त्यांनी काम केले.[ संदर्भ हवा ]

ह्युस्टनस्थित टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते तसेच भारतीय सैन्यदलाच्या विभागाचेही ते हृदयरोगतज्ज्ञ सल्लागार होते. महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वैद्यकीय सल्लागार चमूमध्येही त्यांचा सहभाग होता. मुंबईतील हाफकिन संस्थेच्या अध्यक्षपदाचा त्यांनी १४ वर्षे कार्यभार सांभाळला. त्यांच्या पुढाकारातूनच पोलिओची लस निर्मिली गेली असून[ संदर्भ हवा ] त्याला जागतिक आरोग्य संघटनेची मान्यतादेखील मिळाली आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरही गोयल यांनी वैद्यकीय व शिक्षणक्षेत्रात दिलेले भरीव योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. गोयल यांनी केवळ भारतातील शेकडो रुग्णांना जीवनदान दिले नाही, तर अनेक कुशल डॉक्टरही तयार केले. त्यांचे विद्यार्थी आज जगात अनेक ठिकाणी उत्तम वैद्यकीय सेवा देत राहतील.

गोयल यांनी पन्नास वर्षांहून अधिक वर्षे वैद्यकीय सेवा केली. यात त्यांनी गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता निस्पृह भावनेने रुग्णसेवा केली.[ दुजोरा हवा]

गोयल यांचा २०१८मध्ये मृत्यू झाल्यावर त्यांच्या पार्थिवावर मुंबईतील बाणगंगा स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.[ संदर्भ हवा ]


डॉ. बी.के. गोयल यांना वेळोवेळी मिळालेले पुरस्कार[संपादन]

  • पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण (शेवटचा २००५ साली)