बीजांडकोष

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गर्भाशयाच्या दोन्ही बाजुला असणारे बीजांडकोश

बीजांडकोश हा स्त्री जनन संस्थेतील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. बीजांडकोशात हजारो स्त्रीबीजे असतात. दर महिन्याला एका बीजांडकोशामध्ये साधारण ५-१० स्त्रीबीजे वाढीला लागतात. या स्त्रीबीजची निर्मिती व वाढ, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोनल्युटिनाइझिंग हॉर्मोन या संप्रेरक अंतःस्रावांमुळे होते. हे अंतःस्राव मेंदूच्या तळाशी असणार्र्या पिट्युटरी ग्रंथीतून निर्माण होतात. या सर्व स्त्रीबीजांमधून शेवटी एकाचीच वाढ परिपूर्ण होते. एकच परिपक्व झालेले स्त्रीबीजांड, दर महिन्याला बीजांडाबाहेर उत्सर्गले जाते. यालाच स्त्रीबीजोत्सर्ग (ओव्ह्युलेशन) असे म्हणतात.