गर्भाशय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गर्भाशय समोरून

सस्तन प्राण्यांतील मादीमध्ये पोटात असलेला प्रजननाचा अवयव. हा अवयव इंग्लिश भाषा टी (T) आकाराचा असतो. वरच्या दोन बाजू गर्भनलिकांना जोडलेल्या असतात. खालील बाजूस गर्भाशयमुख व योनी असते.

गर्भाशयात बाळाची वाढ होते.

गर्भाशयचे आजार

गर्भाशय व इतर अवयव

गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स)

गर्भाशयातील गाठी (युटेरिन फायब्रॉइड्‌स) म्हणजे गर्भाशयाच्या भिंतींमध्ये होणारी स्नायू, पेशी व इतर ऊतींची वाढ असते. फायब्रॉइड्‌सचा जरी गाठी असा उल्लेख केला असला तरी बहुतांश वेळा त्या कर्करोगाशी संबंधित नसणाऱ्या असतात. वैद्यकीय परिभाषेत फायब्रॉइड्‌सना युटेरिन लिओम्योमा(Uterine Leioyoma) असे संबोधले जाते. फायब्रॉइड्‌सची वाढ एकेरी अथवा पुंजक्यात (समूहाने) होऊ शकते. त्या आकाराने अगदी लहान म्हणजे सफरचंदाच्या बी एवढया (एक इंचाहूनही कमी) किंवा द्राक्षाच्या फळाएवढया (आठ इंच अथवा त्याहून अधिक) मोठया असू शकतात.

गर्भाशयाचा कर्करोग

गर्भाशयाच्या मुखातील गाठी म्हणजे ऊतींची वाढ होऊन कर्करोग होण्याचे शक्यता असते.

गर्भनलिकांच्या गाठी

गर्भनलिका अवरुद्ध होऊन त्यामध्ये गाठी तयार होण्याची शक्यता असते.

तपासणी पद्धती

गर्भाशयाच्या तपासणीकरिता खालील तपासणी पद्धती वापरतात.

  • योनी मार्गातील तपासणी - योनी मार्गातून ग्लोव्ह्जच्या मदतीने तपासणी करून गर्भाशयाचा आकार, आकारमान तपासले जाते.
  • सोनोग्राफी - पोटाची सोनोग्राफी करून गर्भाशयाचा आकारमान व स्थान निश्चित केले जाते. गर्भाशयात असणारा गर्भ व त्याच आकारमान व वाढ पहाण्याकरिता सोनोग्राफी केली जाते.
  • एमआरआय- चुंबक व रेडिओ लहरींचा चित्र घेण्यासाठी वापर करून गर्भाशयाचा आकारमान व स्थान निश्चित केले जाते.
  • क्ष-किरण- शरीराच्या अंतर्भागात पाहण्यासाठी व चित्र घेण्यासाठी एक प्रकारच्या उत्सर्जनाचा वापर केला जातो.
  • सीटी स्कॅन- परिपूर्ण प्रतिमा मिळविण्यासाठी वेगवेगळ्या कोनांतून शरीराची अनेक चित्रे घेऊन गर्भाशयाच्या कर्करोग किंवा इतर आजारांचा अभ्यास केला जातो.
  • लॅप्रोस्कोपी- भूल देऊन केली जाणारी शस्त्रक्रिया, ज्यात डॉक्टर तुमच्या पोटाला बारीकसा छेद करतात आणि आत गर्भाशयाची तपासणी करण्याकरिता लहानशी नळी सोडतात.
  • हिस्टेरोस्कोपी- या शस्त्रक्रियेत डॉक्टर आत गर्भाशयाच्या अस्तराची पाहणी करण्याकरिता कॅमेरा जोडलेली एक लांब नळी योनिमार्गातून थेट गर्भाशयात सोडतात व गर्भाशयात सलाइन अथवा कार्बन डायॉक्साइड भरतात. डॉक्टरांबरोबरच रूग्णालाही गर्भाशयात फायब्रॉइड्‌सची झालेली वाढ व समस्या हिस्ट्रोस्कोपीद्वारे दाखवता येते. नंतर हिस्ट्रोस्कोप काढून टाकला जातो. हे काम १ ते दोन मिनिटांत होते. गर्भाशय अस्तराचा नमुना घेण्यासाठी प्लास्टिकची नळी वापरली जाते.
  • गर्भाशयाचे आतील अस्तर खरवडून काढून त्याची सुक्ष्मदर्शकाखाली तपासणी केली जाते.