बिटकॉईन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बिटकॉईनचा लोगो
बिटकोईन ३ मिनीटेत शिकणे

बिटकॉईन हे एक आंतरजालीय चलन आहे. या चलनाद्वारे पैसे जगभरात पाठवता येतात. ही एक क्रिप्टॉग्राफी प्रकारातील हॅशींग ही कल्पना वापरून तयार केलेली योजना आहे. बिटकॉईन सुरक्षित, जागतिक आणि करमुक्त चलन आहे यावर काही लोकांचा विश्वास बसल्याने या चलनाची लोकप्रियता आणि मूल्य वाढते आहे. इ.स. २१४० मध्ये नवीन बिटकॉईन निर्माण होण्याचे थांबणार आहे असे मानले जाते.ऑगस्ट 2013 अखेर जगात बिटकॉईन ने होणाऱ्या व्यवहरांची संख्या 1.5 बिलियन डॉलर गेली होती.हे एक आभासी चलन आहे.अनेक देशात याला कायदेशीर रित्या मान्यता नाही.बिटकॉईन साठवणे अगदी सोपे आहे. बिटकॉइन हे एक डिझीटल आभासी चलन आहे , विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटचा वापर करून बिटकॉइन व्दारा व्यवहार करता येतात , बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुठलीही केंद्रीय संस्था नाही , व्यवहारांच्या संख्येवरून लेजर नावाचे यंत्र बिटकॉइनची किंमत , मागणी व पुरवठा ठरविते वस्तु विकणारा आणि घेणारा व्यक्ती व्यवहार करण्यासाठी बिटकॉइन चा वापर करतात म्हणजे वस्तू विकणाराच्या खात्यावर त्या वस्तूच्या किमतीइतके बिटकॉइन पॉईंट्स जमा होतात, हा विक्रेता दुसरी एखादी वस्तु घेणार असेल , तर तो या बिटकॉइन पॉईंट्स मधून खर्च करतो

उद्गम[संपादन]

हे चलन सर्वप्रथम ३ जानेवारी २००९ साली अस्तित्वात आले.याचे मुल्य तेंव्हा १ सेंट इतके होते.५ डिसेंबर २०१७ला याचे मूल्य १४,००००० डॉलर इतकी झाली होती. बिटकॉइन्स कसे मिळतात ? १) वस्तु व सेवा विक्री केल्यास २) बिटकॉईन्स एक्स्चेंज मधून बिटकॉईन्स घेतल्यास ३) बिटकॉईन्सची अदलाबदल केल्यास बिटकॉईन्स पॉईंट्स चे बिटकॉइन नाण्यामध्ये रूपांतर करता येते , या नाण्यांना casascius कॉईन्स असे म्हणतात , या नाण्यांच्या आत एक पत्ता आणि एक passkey असते . नाण्यांनी व्यवहार करता येतात नाण्यांचे पुन्हा बिटकॉईन्स पॉईंट्स मध्ये रूपांतर करावयाचे असल्यास पत्ता व passkey टाकून नाणे बाद केले जाते आणि तेवढे पॉईंट्स संगणकीय खात्यात हस्तांतरीत होतात

टीका[संपादन]

बिटकॉईन हे निरर्थक आहे कारण सोन्यासारखे त्याला भौतिक अस्तित्व नाही अशी टीका या चलनावर केली जाते.मर्यादित वापर असल्यामुळे सर्व व्यवहार बिटकॉइनने शक्य होत नाहीत ,तसेच व्यवहारांची संख्या मर्यादित असल्यामुळे बिटकॉइनच्या किमतीत जास्त चढउतार संभवतात या चलनास कोणताही कायदेशीर आधार नाही त्यामुळे कोणीही यात पैसे गुंतविल्यास व ते डुबल्यास याचेवर कार्यवाही करता येऊ शकत नाही.बिटकॉइन साठी वापरलेले तंत्रज्ञान अपुरे आहे , कारण बिटकॉईन्ससाठी लागणारे तंत्रज्ञान दिवसेंदिवस प्रगत करावे लागणार आहे त्याचे पुढे काय होईल याचा अंदाज बांधणे कठीण आहे , कारणं याचा सर्व डोलारा विशिष्ट सदस्यांच्या ' स्वीकृतीवर आधारलेला आहे .

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]