Jump to content

बालाजी वेफर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बालाजी वेफर्स
संकेतस्थळ balajiwafers.com

बालाजी वेफर्स ही कंपनी राजकोट, गुजरात, भारत येथे स्थित आहे. ती नमकीन बटाटा चिप्स आणि इतर धान्यांपासून स्नॅक्स तयार आणि वितरण करते.[] मायक्रो-बिझिनेस म्हणून सुरू झालेली ही कंपनी आता २,००० कोटी (US$४४४ दशलक्ष) पेक्षा जास्त वाढली आहे. भारतीय चव असलेल्या उत्पादनांची कंपनी म्हणून ही प्रसिद्ध आहे.[]

इतिहास

[संपादन]

बालाजी कंपनी १९७६ मध्ये विरानी ग्रुप तर्फे सुरू झाली [] चंदुभाई व त्यांचे भाऊ भिखुभाई आणि कनुभाई यांनी मिळून जामनगर जिल्ह्यातील एका छोट्या गावात, धुन धोरजी येथे स्थलांतरण केले. त्यांचे वडील पोपटभाई विरानी एक शेतकरी होते. त्यांनी वडिलोपार्जित शेतजमीन विकली आणि व्यवसायासाठी २०,००० (US$४४४) दिले होते.  [ <span title="This claim needs references to reliable sources. (June 2020)">उद्धरण आवश्यक</span> ] विरानी भावांनी हे पैसे शेतीच्या उपकरणावर गुंतवले, परंतु त्यात त्यांना यश मिळू शकले नाही आणि ते पैसे गमावले. काकुभाई आणि त्याच्या भावांनी १९७४ मध्ये राजकोटमधील सिनेमा हॉलच्या कॅन्टीनमधून वेफर व्यवसाय सुरू केला. १९८९ पर्यंत या वेफर्सची निर्मिती घरच्या घरी केली जात होती आणि राजकोट शहरामध्ये आणि आसपास वितरीत केली जात होती.[]

त्यांच्या किरकोळ यशाने पारंपारिक तळण्याच्या पद्धतीने वेफर्स तयार करण्याऐवजी अर्ध-स्वयंचलित कारखाना स्थापित करण्यास प्रेरित केले. हे उत्पादन हळूहळू गुजरातच्या प्रत्येक भागात पोहचले. विरानी समुहाला संपूर्ण पश्चिम भारत ताब्यात घ्यायचा होता, त्यासाठी स्वयंचलित प्रकल्प सुरू करण्यात आला. नंतर हाच गुजरातमधील सर्वात मोठा स्वयंचलित प्रकल्प ठरला.

बाजारातील वाटा

[संपादन]

युरोमोनिटरच्या म्हणण्यानुसार २०१२ मध्ये स्थानिक बटाटा आणि भाजीपाला चिप्समध्ये बालाजी कंपनीचा वाटा १३.७% झाला. स.न. २००८ in मध्ये हीचा वाटा ९.५% होता. पाश्चात्य बाजारावरही बालाजींचे वर्चस्व आहे. त्यात ७% वाटा आहे. त्याच्या मूळ राज्यात गुजरातमध्ये ९०% वाटा आहे.[] इकॉनॉमिक टाइम्सने बालाजी वेफर्सला 'वेफर्सचा सुलतान' म्हणून मान्यता दिली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b "PepsiCo said to be exploring offer for Balaji Wafers". Mint. 2013-08-20. 2014-05-11 रोजी पाहिले.
  2. ^ "2nd AIM-AMA Sheth Foundation Doctoral Consortium". Iimahd.ernet.in. 2014-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-11 रोजी पाहिले.
  3. ^ "Industrial Visit at Balaji Wafers Pvt. Ltd - Techshristi". Techshristi (इंग्रजी भाषेत). 2017-06-01. 2017-12-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-12-25 रोजी पाहिले.
  4. ^ "SME Magazines- Small Business Entrepreneurs Magazine Online in India". 2018-09-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-09-24 रोजी पाहिले.
  5. ^ Shramana Ganguly Mehta (2009-12-23). "Balaji Wafers a name to reckon with in Gujarat snacks market - Economic Times". द इकोनॉमिक टाइम्स. 2014-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-11 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]