Jump to content

बालमोहन विद्यामंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बालमोहन विद्यालय (दादर) या पानावरून पुनर्निर्देशित)
बालमोहन विद्यामंदिर
Campus शहरी



बालमोहन विद्यामंदिर ही शाळा मुंबई मध्ये दादर भागात शिवाजी पार्क येथे आहे.

विभाग

[संपादन]
  • पूर्व प्राथमिक
  • प्राथमिक
  • माध्यमिक

परंपरा

[संपादन]


महाराष्ट्र टाईम्स वाचकांचा पत्रव्यवहार-१ एप्रिल

[१][permanent dead link]

इ.स. २००६ हे दादरला 'बालमोहन विद्यामंदिर'ची स्थापना करून अविरत 'ज्ञानयज्ञ' चालू ठेवणाऱ्या ज्ञानमहर्षी दादासाहेब रेगे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. 'बालमोहन'चा विद्यार्थी असणे हा एक गौरव आहे व ही गौरवास्पद परंपरा भावी पिढ्याही चालूच ठेवणार, ही खात्री आहे.

आपल्या विद्यार्थ्यांना आदर्श व्यक्ती घडवणाऱ्या व बालमोहनसाठी तनमनधन अर्पण करणाऱ्या दादासाहेबांवरूनच बहुधा पु. ल. देशपांडे यांना व्यक्ती व वल्लीमधील 'चितळे मास्तर' ही व्यक्तिरेखा सुचली असावी. देशासाठी बलिदान करणाऱ्या (कै.) लेफ्टनंट दिलीप गुप्तेंपासून राजकारणातील उगवता तारा राज ठाकरे व अनेक डॉक्टर्स, वकील, लेखापाल, उच्च पोलीस व सनदी अधिकारी बालमोहनने देशाला अर्पण केले. दादासाहेबांनी लावलेल्या रोपाचा दादर येथील भव्य बालमोहन विद्यामंदिर व तळेगाव दाभाडे येथील रामभाऊ परूळेकर विद्यानिकेतनच्या [स्थापना: २२ जून १९७०] रूपाने महावृक्ष होऊन पिढ्यान् पिढ्या आदर्शत्वाची सुमधुर फळे देत राहणार आहे.

बालमोहनच्या संस्थाचालकांनी व शिक्षकांनी संगणक क्रांती, मायबोली मराठीची होणारी उपेक्षा, ऱ्हास होणारी संस्कृत भाषा व आधुनिक शिक्षण पद्धती ही आव्हाने स्वीकारून शिक्षण क्षेत्रात 'बालमोहन' हा परवलीचा शब्द करून दाखवावा, हाच खरा दादासाहेब रेगे यांच्या वत्सल स्मृतीस मानाचा मुजरा ठरेल.

बाह्य दुवे

[संपादन]