बार्बाडोस राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्गदर्शक
मोझांबिक
बार्बाडोसचा ध्वज
बार्बाडोसचा ध्वज
बार्बाडोसचा ध्वज
कर्णधार हेली मॅथ्यूस
पहिला सामना
पर्यंत १९ ऑगस्ट इ.स. २०२२

बार्बाडोस राष्ट्रीय महिला क्रिकेट संघ हा आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये बार्बाडोसचे प्रतिनिधित्व करणारा संघ आहे. आंतरराष्ट्रीय पटलावर कैरेबियन बेटे वेस्ट इंडीजच्या ध्वजाखाली एकत्र खेळतात. बार्बाडोस संघ वेस्ट इंडीजमधील स्थानिक महिला स्पर्धांमध्ये सहभाग घेतो.

इ.स. २०२२ मध्ये राष्ट्रकुल खेळासाठी वेस्ट इंडीजच्या कोट्यातून बार्बाडोस संघ पात्र ठरला. आयसीसीने सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा दिला होता. त्यामुळे बार्बाडोस महिलांनी २९ जुलै २०२२ रोजी पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. पाकिस्तानवर बार्बाडोसने ऐतिहासिक विजय मिळवला. परंतु पुढे भारत आणि ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवामुळे बार्बाडोसचे आव्हान गट फेरीतच संपुष्टात आले.