बाबुराव गुरव
डॉ . बाबुराव गुरव हे मराठी साहित्यिक, प्राध्यापक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. हे जानेवारी २०१३ मध्ये राहुरी येथे झालेल्या ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.[१]
व्यक्तिगत जीवन
[संपादन]बाबुराव गुरवांचं मूळ गाव सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील कवठेएकंद आहे. निवृत्ती नंतर ते तासगावला स्थायिक झाले .
कारकीर्द
[संपादन]या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेत ३५ वर्षांहून अधिक काळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर पीएच . डी . केली. विद्रोही - सामाजिक चळवळींचा ते सक्रीय असत.
' एम . फुक्टो ' या प्राध्यापकांच्या संघटनेचे राष्ट्रीय स्तरावरील नेते होते, घरणग्रस्तांचं आंदोलन , दुष्काळी भागातील पाणीआंदोलन , धार्मिक व वांशिक दंगलविरोधी आंदोलनात सहभागी असत . 'अण्णाभाऊं साठे' , ' या जगात देव आहे का ?', ' भारतीय स्वातंत्र्य चळवळ - लोकविद्रोहाचा धगधगता अंगार ', ' फुले - शाहू - आंबेडकरवाद - समाजपरिवर्तनाची नवी दिशा ' इत्यादी विषयांवर पुस्तिका लिहिल्या.
राजर्षी शाहू , क्रांतिसिंह नाना पाटील , कर्मवीर भाऊराव पाटील , गाडगे महाराज , नागनाथअण्णा नायकवडी अशा अनेकांची चरित्रंही लिहिली . ' भैनाळ ', ' पाणी ', ' विवस्त्रा ' या त्यांच्या कादंबऱ्याही सामाजिक विषयांनाच वाचा फोडणाऱ्या होत्या . आपल्या साहित्यातून आणि विचारांतून हे सामाजिक भान सातत्याने राखले .