बहे (वाळवा)
?बहे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | वाळवा |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
बहे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील एक गाव आहे.
हे गाव वाळवे तालुक्यात कृष्णेच्या तीरावर बोरगावजवळच आहे. आणि म्हणूनच या गावाचा उल्लेख बहे-बोरगाव असा केला जातो. “कृष्णा माहात्म्यात“ या गावाचा उल्लेख बाहुक्षेत्र असा केला आहे. येथे कृष्णा नदीचा प्रवाह दोन धारांत विभागून वाहत असून मध्यभागी एक लहानसे बेट तयार झालेले आहे. या बेटावर समर्थ रामदास स्वामींनी मारुतीची स्थापना केली आहे. हा मारुती समर्थांच्या अकरा मारुतीपैकी एक आहे.तसेच भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी स्वातंत्र्यसेनानी, क्रांतिकारी क्रांतिकारी नायक ,क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव म्हणून ओळख आहे. त्यांचे पूर्ण नाव नाना रामचंद्र पिसाळ होते आणि ते हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनचे संस्थापक सदस्य होते जे 1929 ते 1932 दरम्यान भूमिगत झाले होते.
भौगोलिक स्थान
[संपादन]निसर्गाच्या कुशीत असलेले बहे गावाच्या उत्तरेस कृष्णा नदी तसेच गावच्या पुर्वेस पेठ येथून आलेला ओढा आहे .वायव्येस रामलिंग बेट हे तिर्थक्षेत्र आहे. बहे गावापासून जिल्ह्याचे ठिकाण सांगली सुमारे 48 कि.मी. अंतरावर आहे. तसेच आशियाई महामार्ग ४७ ( पुणे बेंगलोर हाईवे) पासून बहे गाव हे फक्त 10 किमी अंतरावर आहे बहे गावापासून दोन प्रमुख शहरे जवळ आहेत उरुण-इस्लामपूर हे 7 किमीं अंतरावर आहे तर कराड हे शहर २५ किमी अंतरावर आहे बहे गावाचे क्षेत्रफळ सुमारे 1231.00 हेक्टर आहे.
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.
लोकजीवन
[संपादन]बहे गावात प्रामुख्याने शेतीकरणारे लोकजीवन आहे
दरवर्षी पावसाळ्यापूर्वी शेकारावी लागणारी गवताच्या छपरांची घरे जवळपास संपुष्टात आलेली आहेत. आता तर सर्रास 'आरसीसी'ची घरे पाहायला मिळतात. एकाच वाडीवर राहणारी एकमेकांची नातेवाईक मंडळी भावकीतून बाजूला होऊन आपापल्या शेताच्या वाटणीत घरे बांधून राहू लागली आहेत.
१९४०-९५ पर्यंत वाकड्या-तिकड्या लाकडाच्या मेडी उभ्या करून, उभारलेले जनावरांचे गोठे आता कालबाह्य होत आहेत. शास्त्रीय पद्धतीने सिमेंट कोबा करून गव्हान करून जनावरांचे गोठे उभारले जात आहेत. लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या वेळी गावात आल्यावर हक्काने रस्त्यांची, गेले कित्येक वर्षे प्रलंबित असणारा प्रश्न स्मशानभूमी ,गावास क्रिंडागंण,सरकारी दवाखाना,अनेक पुरातन मंदीराचे जिर्णोदार ,तसेच क्रांतिसिंह नाना पाटील यांचे जन्मगाव असल्याने त्यांच्या स्मारकाची वारंवार मागणी केली जात आहे. हळूहळू गावामध्ये लोकसंख्येच्या राजकीय दबावामुळे या गोष्टी घडत आहेत. शेतकऱ्यांची घरे आता किचन, बाथरूम यांसह अत्याधुनिक टाइल्स लावून बनवली जातात. वाडी-वस्ती वर टीव्ही केव्हाच पोहोचला आहे आणि मोबाईल, इंटरनेट डाटा पॅकमुळे जगात अर्धा तासापूर्वी प्रसारित झालेला व्हिडिओ गुराख्याच्या मोबाईलवर दिसू लागला आहे.
गावातील वाढती लोकसंख्या बघता गावा बाहेर शेतात मजबूत सर्रास 'आरसीसी'ची घरांची संख्या वाढायला लागली आहे.
लोक संस्कृती, शेतीजीवनाचा व निसर्गाचा घनिष्ठ संबंध आहे, तरीही शहरी संस्कृतीचा प्रभाव ग्रामीण भागावर पडत आहे. प्रत्येक सणावारासाठी गावी जाणारी माणसे आता गावी जात नाही. किंबहुना, कोणत्याही एकावेळी गावातलीच १०- २० टक्के माणसं नोकरीसाठी, सरकारी कामासाठी, हॉस्पिटल मधल्या उपचारासाठी, शिकण्यासाठी किंवा अन्य कामासाठी शहरांमध्ये दिसतात. शेतीशी संबंधित असलेले सण भोगी, अमावास्या, पूनव, गावच्या जत्रा यामध्ये सुद्धा बदल होत आहेत. ग्रामदैवताचे दर्शन घेण्यासाठी चारचाकी वाहनांनी काही तासांसाठी जाऊन परत शहरात जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]वाळ्वे तालुक्यातील बहे येथील रामलिंग बेट नागरिकाचे श्रद्धास्थान व पर्यटनस्थळ म्हणून सांगली जिल्हयात प्रसिद्ध आहे. इस्लामपुरापासून दहा किलोमीटर अंतरावर बहेलगत कृष्णा नदीच्या पात्रात हे रामलिंग बेट आहे.बेटावर चिंच, वड,पिंपळ,जाभूळ व इतर फुलझाडे यांसारख्या वृक्षवेलीनी परिसर सुशोभित आहे.अनेक वेगळ्या प्रकारचे पक्षी या ठिकाणी पहावयास मिळतात
लंकेहून परत येताना श्रीरमचंद्र कृष्णा स्नानासाठी या ठिकाणी उतरले जवळच असलेल्या शिरटे गावात सीतामाई स्नानासाठी राहिल्या.श्रीरामांनी या बेटावर स्नान करून तेथे शिवलिंग स्थापले.शिवलिंगाची पूजा चालू असताना कृष्णेस उल्हास येऊन ती गर्जना करू लागली हनुमान जवळच उभे होते.महापुर येतोय असे पाहून त्यांनी नदीला आलेले पाणी दोन्ही बाहुनी थोपावले म्हणून या गावचा बाहूक्षेत्र असा उल्लेख झाला अशी आख्यायिका आहे. कृष्णा नदीला महापूर आल्याचार बेटाकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद होतात.
अंत्यत रमणीय परिसरामुळे नागरिकंना विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून विकसित करण्यासाठी या बेटाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्याची योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे.यासाठी सहा कोटी ६८ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे यापैकी पहिला हप्ता म्हणून शासनाने दोन कोटी रुपये दिले आहेत.
या रामलिंग बेटावर मोठा पुल ३६ कमानींचा पुल आहे २०१८ साली त्या पुलाचे श्री अटलबिहारी वाजपेयी सेतू असे नामकरण करण्यात आले .
बेटवर येणाऱ्या पर्यटकांना नौकाविहाराचा आनंद लुटता यावा, यासाठी बोटिंगची व्यवस्था आहे..या बेटावर वर्षभर धार्मिक उत्सव सुरू असतात.श्रीरामनवमी चा उत्सव मोठ्या प्रमाणात असतो श्री उत्तमराव आकाराम जाधव-पाटील यांचे स्मरणार्थ श्री.प्रसाद(दादा) उत्तमराव जाधव-पाटील यांच्या वतीने महानैवैद्य,अन्नदान होते .
पौष आमवस्येला मोठी विशाळी यात्रा भरते. या बेटावर समर्थ रामदास स्वामींनी ११ पैकी एका मारुतीची स्थापना केली आहे. हा मारुती समर्थांच्या अकरा मारुतीपैकी एक आहे.. समर्थ रामदास मंडळ यांचे वतीने दासनवमीचे आयोजन केले जाते चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती असे उत्सव साजरे केले जातात. वाळवे तालुक्याबरोबरच जिल्हा व शेजारच्या जिल्हातून या बेटाला भेटी देण्यासाठी नागरिकाची वर्दळ असते. एक दिवसाची छोटी सहल आयोजित करण्यासाठी हे ठिकाण रमणीय व निसर्गसौदर्याने संपन्न आहे.
नागरी सुविधा
[संपादन]ग्रामीण भागाला नागरी सेवा पुरविणे याचे मॅाडेल भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॅा.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी मांडले
तथापी बहे गावात गावठाणासाठी जागा,पाणी पुरवठा, शाळा,बॅक,पोस्ट,गावात बांधलेली उघडी गटारे,वीज,एस.टी.थांबा,समाजमंदीर,अंतर्गत रस्ते ,दफनभूमी,याची सोय आहे. तसेच बहे गावाला स्मशानभूमी ,क्रिंडागण,सार्वजनिक शौचालय, मोठी बाजारपेठ ,बहे गावच्या दोन्ही बाजूला साखर कारखाने असल्यामुळे तसेच गावाला पर्यायी रिंगरोड नसल्यामुळे अवजड वहानांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते गावातील मुख्यरस्ता हा लहान असल्याने वहातूक कोंडी होते, पुरग्रस्थ नागरिकांची स्तलांतराची गैरसोय या नागरी सुविधांचा अभाव अढळतो.
जवळपासची गावे
[संपादन]नृसिंहपुर, तांबवे,शिरटे,नेर्ले,बोरगावं,हुबालवाडी,उरुण-इस्लामपूर,