बलुचिस्तान मुक्तिसेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

thumb|right|250px|बलुचिस्तान मुक्तिसेनेचा ध्वज बलुचिस्तान मुक्ती सेना (मराठी लेखनभेद: बलुचिस्तान मुक्ती सेना; इंग्लिश: Balochistan Liberation Army ;) ही बलोच राष्ट्रवादी अलगतावादी संघटना आहे. बलुचिस्तानाला पाकिस्तान आणि इराण या देशांपासून स्वातंत्र्य मिळवून देणे हे ह्या संघटनेचे उद्दिष्ट आहे. इ.स. २००० सालाच्या सुमारास पाकिस्तानातील काही बाजारांमध्ये आणि रेल्वे रुळांवर घातपाती बाँबस्फोट केल्यानंतर ह्या संघटनेला प्रसिद्धी मिळाली. इ.स. २००६ साली पाकिस्तानी शासनाने व ब्रिटिश शासनाने बलुचिस्तान मुक्तिसेनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले.

नेतृत्व[संपादन]

नवाब खैर बख्श मारी याचा मुलगा मीर बलाच मारी याला बलुचिस्तान मुक्तिसेनेचा नेता मानण्यात येते.