बर्था गिंडिकेस दखार
Appearance
बर्था गिंडिकेस दखार (??:शिलाँग, मेघालय, भारत - ) या भारतीय शिक्षिका आहेत. त्यांनी खासी भाषेसाठी ब्रेल लिपी तयार केली.
दखार यांना रेटिनायटिस पिगमेंटोसा हा व्याधी झाल व त्यामुळे महाविद्यालयात शिकत असताना त्यांची दृष्टी कायमची गेली. शिक्षण सोडल्यावर रोजगारीचे काही साधन नसल्याने त्यांनी रस्त्यावर फळे विकली परंतु त्याच बरोबर अंधत्वातून मार्ग काढण्यासाठी त्यांनी ब्रेल लिपी शिकून घेतली व नंतर आपल्या खासी भाषेसाठी ती विकसित केली. त्या शिलाँगमधील ज्योती स्रोत स्कूलच्या आचार्या आहेत.
२०१०मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार दिला.