बर्गे
मराठा बर्गे, उपनाव निकम हे एक सूर्यवंशी मराठा घराणे आहे. निकम ही मराठा कुळी निकुंभ राजवंशाची शाखा आहे. त्यांचे मूळ अयोध्या आहे.
उत्पत्ति :
[संपादन]बहमनी कालखंडात शिलेदारांना अथवा बारगीर वीर पुरुषांना बर्गे व नाइकवडी म्हणत. त्यापासून बर्गे म्हणजे लढाऊ वीर आशा अर्थाने निकमांना ही उपाधि मिळाली असावी. परंतु, बर्गे आडनाव कसे पडले याविषयी एक आख्यायिका आहे ती अशी कि निकम कुळातील योद्ध्यानी अनेकांचा एकाच वेळी प्रतिकार करू शकणारे वा हल्ला थोपवू शकणारे शस्त्र वापरले. ते शस्त्र म्हणजे बर्गे / बरगे म्हणूनच असे शस्त्र वापरणारे ते बर्गे. बर्गे यांच्या मूळ पुरुषाला पाच मुले होती. त्यापैकी तीन मुले कोरेगावला ( जिल्हा सातारा ) व दोन मुले पैकी एक चिंचनेरला व एक महादेव डोंगराला ( जिल्हा सातारा ) स्थायिक झाल्याने त्यांचा वंश वृक्ष फोफावला.
बर्गे कुळाचार:
[संपादन]- नाव : बर्गे
- कुली : निकम
- जात : ९६ कुळी क्षत्रिय मराठा
- मूळ गादी : आभरण ( अभानेर - हे अलवर, जयपुर या जवळ राजस्थान )सैधंति, कर्नाटक.
- वंश : सूर्यवंश
- राजाचे नाव / पदवी : प्रभाकरवर्मा
- गोत्र : पराशर / मानव्य
- वेद : यजुर्वेद
- अश्व / वारू : पिवळा
- निशाण : ध्वजस्तंभी हनुमान
- मंत्र : सूर्य गायत्री मंत्र
- कुल देवता : जोगेश्वरी (अंबाजोगाई )/मुळ तुळजाभवानी
- देवक : उंबर, वेळु, सोन्याची रुद्राक्ष माळ किंवा कांद्याची माळ, कलंब
( निकुंभ हे राजे रघुवंशी असल्याचे दावा करतात व ते अयोध्येहुन नर्मदेच्या दक्षिण तटावर कान्हादेशात खान्देशात आले. मराठा निकम हे निकुंभ राजे वंशज असल्याने त्यांचे खानदेश वर राज्य होते. खानदेश वर निकुंभानी अनेक शतके राज्य केले ८ व्या शतकापासून ते अगदी आजपर्यंत बरेचसे लोक तेथे आहेत. अल्लशक्ति , वैरदेव, कृष्ण आदि महत्त्वाचे राजे या घराण्यातून झाले.) [१], [२]
==प्रसिद्ध मराठा सरदार बर्गे मंडळीची नावे
- सरदार आनंदराव बर्गे
- सरदार क्षेत्रोजीराव बर्गे
- सरदार तुलाजी उर्फ़ तुळाजीराव बर्गे
- सरदार खंडोजीराव बर्गे
- सरदार सेखोजीराव बर्गे
- सरदार राणोजीराव बर्गे
- सरदार सखाराम बर्गे
- सरदार बालोजीराव बर्गे
- सरदार हैबतराव बर्गे
- सरदार येसाजीराव बर्गे
- सरदार सिदोजीराव बर्गे
- सरदार साबाजीराव बर्गे
- सरदार जानोजीराव बर्गे
ही वरील उल्लेखि नावे केवळ उंच शिखरांची आहेत आणि खरे पहु गेले असता यापेक्षा अनेक बर्गे सरदार व त्यांचे घराणे कर्तबगार असूनही त्यांच्याविषयी फारच कमी लिहिले, ऐकले व बोलले गेले. मराठा सरदार बर्गे यांचा इतिहास कागदोपत्री बंदिस्त आहे. तो समजल्यास मराठेशाही इतिहासात मौलिक भर पडेल.
ऐतिहासिक बर्गे घराणे व त्यांचा संक्षिप्त इतिहास :
[संपादन]बर्गे हे बहमनी आमदनी पासून मशहूर असे पराक्रमी घराणे होय. यांनी दख्खनची सुल्तानशाही ज्यात आदिलशाही, निज़ामशाही राजवटीत शौर्य गाजवून वैभव, इनाम वतने व लौकिक मिळवला. बर्गे यांचे कोरेगाव हे प्रान्त वाईतील महत्त्वाचे ठिकाण होते. संमत कोरेगाव, तालुका कोरेगाव, तसेच प्रांत कोरेगाव अशा आशयाचे संदर्भ सापडतात. विविध राजवटीत कोरेगाव तसेच चिंचनेरचे वंश परंपरागत पाटिलकि हक्क, अनेक दुर्मिळ किताब, मान मरातब, जहागिरी, सरंजामी हक्क त्यांना होते. सुल्तानशाही, शिवशाही, मराठा स्वातंत्र्य युद्ध , शाहू काळ, पेशवाई , संस्थानी राजवटी अशा अनेक कालखंड पराक्रमा ने गाजवणारया प्रमुख मराठा घराण्यात त्यांचे मानाचे स्थान आहे. बर्गे घराण्याने अनेक युद्धांत मराठा साम्राज्याची सेवा केली त्यात प्रामुख्याने मराठा स्वातंत्र्य युद्ध, जंजिरा मोहीम, पानिपत, खर्डा इत्यादी महत्त्वाच्या घटना होत. अनेक पोवाड्यात बर्गे वीरांचे गुणगान आढळते. एकंदर इतिहासावरून बर्गे घराण्याला पाटील, सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजाम वतनदार, खासबरदार अशा दुर्मिळ पदव्यांनी गौरवलेले दिसते तसेच सरदार बर्गे घराण्यातील शुरवीर पुरूषानी हिंदवी स्वराज्य रक्षणार्थ जी शस्त्रे धारन (वापरले) ती शस्त्रे आजही बर्गे वंशजाकडे आहेत फार दुर्मीळ ठेवा जपुन ठेवले आहे. तो दुसऱ्या दिवशी पाहायला मिळतो.
सरदार बर्गेंच्या सरंजाम, जहागीर, मोकाशांबद्दल :
[संपादन]- सेनापति दाभाडे, तुलाजी व सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर मिळाली होती.
- सेनापति दाभाडे, तुलाजी व सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर मिळाली होती.
- सिदोजी बर्गे कृष्णाजी नाईक वाघोजी कदम यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे तासगाव मोकासा जहागीर मिळाली होती.
- सिदोजी बर्गे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे सासुरवे प्रान्त कोरेगाव सरदारी जमावाच्या खर्चासाठी / बेग़मीस मोकासा जहागीर मिळाली होती.
- सरदार सेखोजी बर्गे या पराक्रमी सरदाराने मराठेशाही करीता बाजी शिंदे यांच्यासोबत रामचंद्र पंत अमात्य हुकूमत पन्हा यांच्या सुचनेनुसार छत्रपति राजाराम व शुर सरदार संताजी राव घोरपडे यांच्यात मध्यस्ती केली पण ती यशस्वी झाली नाही. ह्यांना छत्रपतितर्फे "खासबरदार" ही अनमोल पदवी मिळाली. जंजीरा मोहिमेसारख्या अनेक लढाया त्यांनी गाजविल्या व सरंजाम, इनामे, वतने व बहुमान संपादित केले.
- सरदार तुलाजी बर्गे यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे खंडाले महाल मोकासा जहागीर मिळाला.
- कोल्हापुर रियासतीत छत्रपति घराण्याचे आप्त घाटगे घराण्यासंदर्भात सखाराम बर्गे यांचा सहकारी म्हणून ऐतिहासिक उल्लेख आहे.
- सरदार तुलाजी बर्गे व सरदार साबाजी बर्गे यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे कोरेगाव मोकासा जहागीर मिळाली होती.
- सरदार सिदोजी बर्गे, सरदार साबाजी भोसले, सरदार रामसिंग निंबाळकर याना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे उडतारे मोकासा जहागीर मिळाली होती.
- सरदार तुलाजी ( तुळाजीराव ) बर्गे, हुजूर सुभा , कोतवाल बंधू , सेनापती दाभाडे यांना छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे सासुरवे मोकासा जहागीर मिळाली होती.
- सरदार तुलाजी बर्गे, सरदार सिदोजी भोसले यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे बाहे गाव मोकासा जहागीर मिळाली होती.
- सरदार बाबाजी बर्गे, सरदार प्रतापराव मोरे, सरदार व्यासो भुजबळ, सरदार उदाजी बंडगर यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे कोताळे बुद्रुक मोकासा जहागीर मिळाली होती.
- सरदार तुलाजी बर्गे, सरदार संताजी जाधव , सरदार पदाजी व मानकोजी बंडगर, किल्ले वर्धनगड यांस छत्रपति शाहूराजे यांचे तर्फे मेटे गाव मोकासा जहागीर मिळाली होती.
- छत्रपति शाहू राजे भोसले सातारकर यांनी बर्गे मंडळी कोरेगावकर यांना एक पत्र पाठवले होते त्यात त्यांनी समाकुल पांढरे सरदार व बालोजी बर्गे यांना सिदोजी व येसाजी बर्गे यांच्या विवाहास अडथळे आणु नये अशी ताकीद दिली होती.
- चिंचनेर, खानापुर, तासगाव, सासुरवे, कोरेगाव सारखी अनेक गावे, महाल सरंजाम इनाम म्हणून तसेच बर्गे लोकांना पराक्रमबद्दल अनेक ठिकाणी शेत सनदा, हक्क सनदा, मान मिळाले होते.
- ग्वालियर संस्थानातही बर्गे हे एक प्रमुख सरदार घराणे होते. " सरदार बर्गे कि गोठ " या नावाचा एक भाग ग्वालियर शहरात आहे. ते सरदार महादजी शिंदे यांच्यासोबत मध्य प्रदेशात जाऊन स्थिरवाले होते. ग्वालियर येथील इंग्रज आमदनीत सरदार बहादुर मेजर बर्गे यांनी जागतिक महायुद्धात सहभाग घेतला होता.
- सातारा जिल्हा प्रतिसरकार, तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीत पण बर्गे घराण्याचा मोलाचा वाट आहे. आजच्या काळात समाज जपून प्रगती करणाऱ्या मराठा मंडळीतही बर्गे प्रमुख आहेत आणि या घराण्यातून ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, आमदार, समाजसेवक, लोकनेते , सुशिक्षित असे समाज अग्रणी होवून त्यांनी देश सेवा बजावलेली आहे.
- बर्गे घराण्याचे नातेवाईक हे प्रमुख मराठा ९६ कुळी घराण्यातील आहेत. तसेच ९६ कुळी मराठ्यांच्या उप कुळी, इतर प्रमुख सरदार, इनामदार, जहागीरदार, सरंजामी वतनदार आदींशी त्यांचे नातेसंबंध आहेत.
संदर्भ :
[संपादन]संदर्भ साधने
[संपादन]- मराठा रियासत
- शाहू दफ्तर
- पेशवा दफ्तर
- ९६ कुळी मराठ्यांवरील आधारित साधने
- पानिपत व खर्डा पोवाडा