फ्लाईंग रानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फ्लाईंग राणी या पानावरून पुनर्निर्देशित)
फ्लाईंग रानीचा फलक

फ्लाईंग रानी ही भारतीय रेल्वेची एक प्रवासी सेवा आहे. पश्चिम रेल्वेद्वारे चालवली जात असलेली ही रेल्वे मुंबईला गुजरातच्या सुरत शहरासोबत जोडते. ही गाडी मुंबई सेंट्रलसुरत स्थानकांदरम्यान रोज धावते व मुंबई ते सुरत दरम्यानचे २६३ किमी अंतर ४ तास व ४० मिनिटांत पूर्ण करते. फ्लाईंग रानी गाडीमध्ये केवळ दुय्यम श्रेणीचे डबलडेकर आसनकक्ष व वातानुकूलित चेअर कार हे दोनच प्रकारचे डबे असून तिला शयनयान (sleeper) डबे जोडले जात नाहीत.

तपशील[संपादन]

वेळापत्रक[संपादन]

गाडी क्रमांक मार्ग प्रस्थान आगमन कधी
१२९२२ सुरत – मुंबई सेंट्रल ०५:२५ १०:१० रोज
१२९२१ मुंबई सेंट्रल – सुरत १७:५५ २२:३५ रोज

बाह्य दुवे[संपादन]