फिंगर लेक्स
फिंगर लेक्स हा अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील ११ सरोवरांचा प्रदेश आहे. अरुंद पण उत्तर-दक्षिणेस लांब आणि खोल असलेली ही सरोवरे राज्याच्या उत्तर भागात लेक ऑन्टॅरियोच्या दक्षिणेस आहेत. ही सरोवरे शेवटच्या हिमयुगाच्या शेवटी उत्तरेकडे सरकणाऱ्या प्रचंड मोठ्या हिमनद्यांनी जमिनीत कोरलेली आहेत.
यातील कायुगा लेक सगळ्यात लांब (६४ किमी) तर सेनेका लेक सगळ्यात खोल (६१८ फूट आहे.) कायुगा आणि सेनेका सरोवरे अमेरिकेतील सगळ्यांत खोल सरोवरांपैकी आहेत व यांचा तळ समुद्रसपाटीच्याही खाली आहे.
सरोवरे
[संपादन]फिंगर लेक्स म्हणून ओळखली जाणारी सरोवरे पूर्वेकडून -
- ओटिस्को लेक
- स्केनीटेलेस लेक
- ओवॅस्को लेक
- कायुगा लेक
- सेनेका लेक
- क्यूका लेक
- कॅनेंडैग्वा लेक
- हनीओय लेक
- कॅनेडाइस लेक
- हेमलॉक लेक
- कोनेसस लेक
याशिवाय ओनोन्डागा लेकला अनेकदा १२वे फिंगर लेक म्हणले जाते.
या प्रदेशात रॉचेस्टर, सिरॅक्यूज, इथाका ही मोठी शहरे आहेत. येथे रॉचेस्टर विद्यापीठ, सिरॅक्यूज विद्यापीठ, कॉर्नेल विद्यापीठ, इथाका कॉलेज, वेल्स कॉलेज, इ. विद्यापीठे आहेत.