जोहोर बारू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोहोर बारू
Johor Bahru
मलेशियामधील शहर

Johor Bahru city in 2015.jpg

जोहोर बारू is located in मलेशिया
जोहोर बारू
जोहोर बारू
जोहोर बारूचे मलेशियामधील स्थान

गुणक: 1°29′00″N 103°44′00″E / 1.48333°N 103.73333°E / 1.48333; 103.73333

देश मलेशिया ध्वज मलेशिया
राज्य जोहोर
स्थापना वर्ष इ.स. १८५५ (वसवणूक)
इ.स. १९९४ (शहर दर्जा बहाल)
क्षेत्रफळ १८५ चौ. किमी (७१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३६.८८ फूट (११.२४ मी)
लोकसंख्या  
  - शहर १३,७०,७३८
  - घनता ७,४०९ /चौ. किमी (१९,१९० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मलेशियन प्रमाणवेळ (यूटीसी+८)
http://www.johordt.gov.my/


जोहोर बारू (मलय: Johor Bahru ; अर्थ: नवीन जवाहीर ;) हे मलेशियाच्या संघातील जोहोर या दक्षिणेकडील राज्याचे राजधानीचे शहर आहे. ते युरेशियन भूखंडावरील दक्षिणतम टोकास वसलेले शहर आहे. जोहोर बारू शहराची लोकसंख्या १३,७०,७३८ (इ.स. २००९), तर जोहोर बारू महानगरीय क्षेत्रातील लोकसंख्या सुमारे २०,००,००० असून संघीय राजधानी असलेले क्वालालंपूर व नजीकच्या क्लांग खोरे क्षेत्राच्या महानगराखालोखाल ते मलेशियातील दुसरे मोठे नागरी क्षेत्र आहे. जोहोर सामुद्रधुनीमुळे सिंगापुरापासून भौगोलिक दृष्ट्या विलग झालेले जोहोर बारू उद्योग, पर्यटन, वाणिज्य व दळणवळण या क्षेत्रांच्या पातळीवर बऱ्याचदा सिंगापुराचे जुळे शहर मानले जाते.

बाह्य दुवे[संपादन]