Jump to content

फराहबक्ष महाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फराहबक्ष महाल, अहिल्यानगर

फराहबक्ष महाल हा महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथे असलेला महाल आहे. चौरसाकृती तलावाच्या मध्यभागी ही अष्टकोनी वास्तू आहे. अहिल्यानगरच्या निजामशाहीतील राजा मुर्तझा निजामशाह याने या महालाचे बांधकाम इ.स. १५७६ ते इ.स. १५८३ या काळात करवून घेतले. घुमट, उंच कमानी व मोठी गवाक्षे असलेल्या महालाच्या मध्यभागी रंगमहाल आहे. मध्यभागी तसेच चारही बाजूला कारंजी असून त्यासाठी त्याकाळी खापरी नळाने पाणी आणण्यात आले होते.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

[संपादन]

भारत सरकारने फराहबक्ष महालाला दिनांक ४ मार्च, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "नोटीफिकेशन ऑफ सेंट्रली प्रोटेक्टेड मॉन्यूमेन्ट्स इन इंडिया" (PDF) (इंग्लिश भाषेत). 2016-03-04 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ५ ऑगस्ट, इ.स. २०१३ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)