फकिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

फकिरा ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली मराठी भाषेतील कादंबरी आहे. ही कादंबरी इ.स. १९५९ साली प्रकाशित झाली. इ.स. १९६१ मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरHस्कार या कादंबरीला दिला आहे. "फकिरा" या कादंबरीला मराठी साहित्यात मानाचे पान लाभले गेले आहे. या कांदबरीत मांग समाजातील फकिरा नावाच्या तरूणाचे कथानक मांडले आहे. ब्रिटिश सत्तेला आव्हान देणारा फकिरा आणि त्याची शौर्यगाथा सांगणारी कलादृष्टया उत्तम अशी ही कादंबरी आहे.

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे , अण्णाभाऊंच्या लेखनाचा केंद्रबिंदू हा संघर्ष आहे.. संघर्ष कशासाठी? कुणासाठी? कुणाविरुद्ध? हे प्रश्न त्यामागोमाग येतात.अण्णा भाऊंनी अनेक कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. समाजातल्या दाहक ,भीषण अशा संघर्षाचं ,शोषणाचं चित्र त्यांच्या अनेक कथा-कादंबऱ्या मध्ये आपल्याला पाहायला मिळतं.

पीडित, वंचित ,दलित, शोषित, मजूर, स्त्रिया या सर्वांसाठी अण्णा भाऊं ची लेखणी सातत्याने लिहिती राहिलेली आहे..... समतेची, न्यायाची वागणूक देत आलेली आहे...... प्रश्नांना वाचा फोडत आलेली आहे...... कामगारांच्या हक्कासाठी लेखणी सातत्याने झिजत राहिलेली आहे. कामगारांना प्रेरणा देण्यासाठी अण्णा भाऊंनी अनेक रचना केलेल्या आहेत . या समग्र साहित्या मधून अण्णाभाऊंनी स्वतःला खऱ्या अर्थाने शाहीर आणि साहित्यिक .त्यातही क्रांती प्रवण साहित्यिक अशी ओळख निर्माण झाली आहे. प्रत्येक लेखकाने स्वतःची भूमिका घेतलेली असते. प्रत्येक लेखक मानवी जीवनाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघत असतो. अण्णाभाऊ साठे हे जीवनवादी लेखक तर आहेतच परंतु ते परिवर्तनाचा पुरस्कारही करत होते .

संदर्भ[संपादन]


[[वर्ग:अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य]